वृत्तसंस्था
ठाणे : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस अर्थात दहशतवाद प्रतिबंधक टीमने थांबवून तपासाची सूत्रे आणि कागदपत्रे एनआयए अर्थात केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्यावीत, असा महत्त्वपूर्ण आदेश ठाणे सत्र न्यायालयाने आज दिला.Hand over investigation of Mansukh Hiren case to NIA; Important order of Thane Sessions Court to Maharashtra ATS
महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करीत होते. त्या हत्येचा उलगडा झाला आहे, असे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून जाहीर केले होते. सचिन वाझेच मनसुख हिरेन यांचा खुनी निघाल्याचेही एटीएसने म्हटले होते. मात्र, या हत्त्या प्रकरणाची कागदपत्रे महाराष्ट्र एटीएस टीम एनआयएच्या टीमला देत नव्हती.
त्यामुळे एनआयएची टीम ठाणे न्यायालयात गेली होती. एनआयएला कोणत्याही प्रकरणाचा तपास हातात घेण्याचा अधिकार आहे. सचिन वाझे देखील २५ मार्चपर्यंत एनआयएच्या कोठडीत अँटिलिया स्फोटके प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात आहे. एटीएसने तो फरार असल्याचे न्यायालयात सांगितले होते.
परंतु, आता ठाणे सत्र न्यायालयाने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसने थांबवावा आणि त्याची सूत्रे आणि कागदपत्रे एनआयएच्या ताब्यात द्यावीत, असा आदेश दिला आहे.
एटीएस टीमचा तपास कसा अँक्टीव्ह झाला...
विधानसभेत मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांनी आणि राज्यातील इतर मंत्र्यांनीही निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या प्रकरणाचे धागेदोरे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचू लागल्याने एटीएस अॅक्टीव्ह झाले. सचिन वाझे हाच हिरेन हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.
Maharashtra: Thane sessions court has asked ATS to stop investigation of Mansukh Hiren death case & hand over the case to NIA.
NIA has approached the court after ATS was not handing over the case to NIA despite MHA's orders in this regard..
— ANI (@ANI) March 24, 2021
ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा प्रताप केल्यावर सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली होती. त्याअगोदर विधानसभेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी वाझेची बाजू घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे जाईल म्हटल्यावर एटीएस अॅक्टीव्ह झाली.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हाच असून, त्याच्याच इशाऱ्यावरून हे हत्याकांड घडल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी आता देऊ लागले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप एटीएसकडेच असून, राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचेही आता एसआयटी म्हणू लागली.
गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून होते. रविवारी या हत्या प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गोर हा क्रिकेट बुकी आहे.
शिंदे निलंबित पोलीस कर्मचारी असून, २००७च्या वसोर्वा येथील लखनभय्या बनावट चकमकीमध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे. याच गुन्ह्यात तो पॅरोल रजेवर असताना वाझेसाठी काम करीत असल्याचे समोर आले आहे. मनसुख हत्या प्रकरणात १० ते ११ आरोपींचा समावेश असून, हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे आणि कशी केली,
याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विनायक शिंदे याच्या कळवा नाका येथील गोल्ड सुमित या इमारतीच्या तळमजल्यावरील घरी एटीएसच्या एका पथकाने रविवारी आणि सोमवारीही झडती घेतली. त्याचबरोबर त्याच्या घरात चौकशी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.
पण आता या तपासासंबंधीची सर्व कागदपत्रे एटीएस टीमला एनआयएच्या टीमकडे द्यावी लागतील.