गोवा – उत्तर प्रदेशात शिवसेनेचे आकडे जाहीर; म्हणजे शिवसेना स्वतंत्र लढणार का?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेश गोवा आणि मणिपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांची आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशात शिवसेना 50 जागा आणि गोव्यात 9 जागांवर निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे.Goa – Shiv Sena figures released in Uttar Pradesh; So will Shiv Sena fight for independence?

यापैकी गोव्यामध्ये संजय राऊत यांनी आधीच महाविकास आघाडीसाठी शिष्टाई करून झाली आहे. ती शिष्टाई फसली आहे. काँग्रेसने संजय राऊत यांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळला आहे.या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत गोव्यामध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्याशी आघाडी करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.



याचा अर्थ शिवसेनेला या आघाडीतून बाजूला ठेवण्याचा पवारांचा विचार आहे का? या प्रश्नावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी युती करून निवडणूक लढविण्याचे पवार यांनी जाहीर केले आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा जागावाटपावर विषयी चर्चा करतील, असे पवार म्हणाले आहेत. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गोव्यातला आणि उत्तर प्रदेशातला निवडणूक लढविण्याचा आकडा जाहीर केलेला नाही.

परंतु खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गोव्यात नऊ जागांवर आणि उत्तर प्रदेशात 50 जागांवर निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे. याचा अर्थ शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात कोणाशीही आघाडी न करता स्वबळावर ही निवडणूक लढवणार आहे का? शरद पवार यांनी शिवसेनेला गोव्यातल्या किंवा उत्तर प्रदेशातल्या आघाडीमध्ये सामील करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे का? या विषयावर देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Goa – Shiv Sena figures released in Uttar Pradesh; So will Shiv Sena fight for independence?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात