पवार-देशमुख यांनी कितीही सत्य दडविले तरी दूध का दूध पाणी होईल, गिरीश बापट यांचा आरोप

शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.Girish Bapat alleges Shard Pawar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल, असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. देशमुख यांनी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांची पाठराखण केली.बापट यांनी गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी वर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी.

कोण कुठे होते यापेक्षाही माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हे महत्वाचे, असेही बापट म्हणाले.15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? सभागृहात शिवसेना खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. विनायक राऊत यांना वेळ मिळाला होता. मात्र, त्यांना दोन तास दिले तरीही ते कमीच पडतील, असा टोलाही बापटांनी यावेळी राऊत यांना लगावला.

Girish Bapat alleges Shard Pawar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*