लवकरात लवकर कामावर हजर व्हा ; अन्य था नोकरी गमवावी लागेल , २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस


राज्यभरातील एसटी आगारतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.Get to work as soon as possible; Others will have to lose their jobs, termination notice to 2296 salaried workers


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील एसटी आगारतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. काही ठिकाणी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून त्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्याने महामंडळाने कारवाई सुरू केली आहे.



आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे.

त्यामुळे आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या ४ हजार ३४९ वर गेली आहे.महामंडळाकडून सेवा समाप्तीची नोटीस बजावल्या कामगारांमध्ये २५ चालक , २१०१ चालक तथा वाहक, १३२ वाहक , २२ सहाय्यक , १६ लिपिक टंकलेखक असा समावेश आहे.आतापर्यंत महामंडळाकडून २०५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आता त्यापाठोपाठ महामंडळात रोजंदारीने काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी २२९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.

Get to work as soon as possible; Others will have to lose their jobs, termination notice to 2296 salaried workers

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात