परमवीर सिंगांची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल; गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज सीबीआयने तातडीने ताब्यात घेण्याची मागणी

वृत्तसंस्था

मुंबई : सचिन वाझे अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या गदारोळात मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सुप्रिम कोर्टाच्या सूचनेनुसार मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh files petition in Bombay High Court

ही याचिका स्वतःच्या बदली विरोधात तसेच सचिन वाझे – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणीखोरीची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, या मागणीसाठी करण्यात आली आहे. या याचिकेत परमवीर सिंग यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, त्यावर मुंबई हायकोर्ट तातडीने आदेश देणे अपेक्षित आहे, तो म्हणजे… गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मुंबईतीलील शासकीय निवासस्थान ज्ञानेश्वरी बंगला येथील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्याचा हा मुद्दा आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तातडीने सीबीआयने ताब्यात घेण्याची मागणी परमवीर सिंग यांनी केली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले जाण्याचा धोका परमवीर सिंग यांना वाटतो आहे.अँटिलिया स्फोटके प्रकरण तसेच आता मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या ताब्यात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई आणि अहमदाबाद येथून एकूण ६ गाड्या पोलीस आणि आता एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत.

या गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासातून आणि ज्ञानेश्वरी बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही स्पष्ट पुरावे बाहेर येऊ शकतात, असे परमवीर सिंग यांना वाटते आहे. परमवीर सिंग यांनी हायकोर्टात सादर केलेल्या याचिकेत या मुद्द्यांचा समावेश केला असला, तरी राजकीय गदारोळाचे रिपोर्टिंग करताना प्रसार माध्यमांचे परमवीर सिंग यांनी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते आहे.

Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh files petition in Bombay High Court

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*