परमवीर सिंगांना सुप्रिम कोर्टाचा झटका; गृहमंत्र्यांना केसमध्ये पार्टी का नाही केले?; सुप्रिम कोर्टातून याचिका मागे; हायकोर्टात याचिका दाखल करण्यास मात्र परवानगी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  सचिन वाझे – मनसुख हिरेन प्रकरणात बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सुप्रिम कोर्टाने काही प्रश्न विचारून झटका दिला आहे.former Mumbai Police chief Param Bir Singh withdraws the plea from Supreme Court approach the Bombay High Court

तक्रार जर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याविरोधात आहे, तर त्यांना केसमध्ये पार्टी का नाही बनविले, असा सवाल सुप्रिम कोर्टाने केला.त्याचवेळी केस एन्टरटेन करायला सुप्रिम कोर्टाने नकार दिला.मात्र, परमवीर सिंग यांनी आपण सुप्रिम कोर्टातून याचिका मागे घेऊन हायकोर्टात याचिका दाखल करतो, हे सांगताच त्यांचे स्वातंत्र्य मान्य करीत सुप्रिम कोर्टाने संबंधित याचिका हायकोर्टात दाखल करण्याचीही मूभा दिली.परमवीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप केला आहे.

सचिन वाझेला अनिल देशमुखांनी आपल्याला असलेल्या १०० कोटींच्या टार्गेटपैकी ४० – ५० कोटी रूपये मुंबईतल्या १७५० बार – रेस्टॉरंटमधून प्रत्येकी २ – ३ लाख रूपये महिना गोळा करीत वसूल करायला सांगितले होते, याची माहिती सचिन वाझेने आपल्याला दिली होती, असा गंभीर आरोप केला आहे. ही याचिका या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात होती.

मात्र, आता सुप्रिम कोर्टाच्या सूचनेनुसार ही याचिका सुप्रिम कोर्टातून काढून घेऊन परमवीर सिंग ती मुंबई हायकोर्टात दाखल करणार आहेत.

former Mumbai Police chief Param Bir Singh withdraws the plea from Supreme Court approach the Bombay High Court

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*