Navneet Rana : राणा दाम्पत्यावर देशद्रोहाची केस लावली, पण सरकारी वकील सिद्ध नाही करू शकले – रिझवान मर्चंट


वृत्तसंस्था

मुंबई : मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर पोलिसांच्या सूचनेनुसार सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 124 ए अर्थात देशद्रोहाची केस लावली. परंतु त्यातले ते काहीही सिद्ध करू शकले नाहीत, असे प्रतिपादन राणा दांपत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी केले. For the first time, public prosecutor Pradip Gharat, obviously on instructions from the police dept,

राणा दाम्पत्यावर 124 ए सह विविध कलमांखाली आरोप लावण्यात आले आहेत. यातला 124 ए देशद्रोहाच्या आरोपाचे कलम आहे. परंतु राणा दाम्पत्याने सरकार विरोधात कुठले उद्गार काढल्याचे दाखवून द्या, असे आव्हान आम्ही कोर्टात दिल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत राणा दांपत्याचे तसे एकही वक्तव्य दाखवू शकले नाहीत.

 

राणा दांपत्याचा फक्त हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह होता बाकी कोणतेही वक्तव्य त्यांनी केलेच नव्हते. त्यामुळे ते प्रत्यक्ष एफआयआरमध्ये लिहिले नाही. त्यामुळे सरकारी वकील ते कोर्टात सादर करू शकले नाहीत, असे रिझवान मर्चंट यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार विरुद्ध राणा दाम्पत्याने एकही शब्द उच्चारलेला नसताना त्यांच्यावर 124 ए कलम लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद रिझवान मर्चंट यांनी केला आहे. त्यानंतरच राणा दांपत्याला पोलीस कोठडी ऐवजी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

For the first time, public prosecutor Pradip Gharat, obviously on instructions from the police dept,

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात