अखेर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला मुहूर्त सापडला, आज होणार भूमिपूजन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजुस तर दुसऱ्या बाजुस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक वास्तुमध्ये ठाकरे यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार आहे. Finally Balasaheb Thackeray National Memorial found a moment inauguration will be held today

31 मार्च रोजी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महापौर निवासात होणार आहे.


Live : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ८:३० वाजता जनतेशी संवाद साधतील.


स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तु उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

Finally Balasaheb Thackeray National Memorial found a moment inauguration will be held today

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*