ठाकरे सरकारचे सुडाचे राजकारण, भाजपाला रेमेडिसीवर पुरविण्याचे पत्र देणारे एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली


ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्याप्रकरणी तोंडावर पडलेल्या ठाकरे सरकारने सुडाचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला रेमेडिसीवर पुरविण्यासाठी परवानगी देणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.FDA Commissioner Abhimanyu Kale, who had given a letter to the BJP to provide remediation, was abruptly replaced.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्याप्रकरणी तोंडावर पडलेल्या ठाकरे सरकारने सुडाचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला रेमेडिसीवर पुरविण्यासाठी परवानगी देणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

बु्रक फार्मा या कंपनीकडून ५० हजार रेमेडिसीवर विकत घेऊन महाराष्ट्र सरकारला देण्याची तयारी भाजपाने केली होती. मात्र, यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा इगो दुखावला गेला. ब्रुक फार्माच्या मालकांना रात्रीच्या वेळी पोलीसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्या सुटकेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना पोलीस ठाण्यात जावे लागले. त्यानंतर महाराष्ट्राच्या एफडीएनेच रेमेडिसीवर पुरविण्यासाठी पत्र दिल्याचे उघड झाले. यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा चांगलात तिळपापड झाला होता.

मंत्रीमंडळाच्या बैठकी अजित पवार, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी ‘काळेंवर कारवाई करा, अशी मागणी केली होती. विलेपार्ले पोलिस स्टेशनला घडलेला प्रकार, विरोधी पक्षाचा हस्तक्षेप आणि एफडीए आयुक्त काळेंनी दिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

त्यामुळे काळे यांची बदली करण्यता आली. काळेंची बदली करुन ठाकरे सरकारनं सूडाचा कळस गाठल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलविल्याचा प्रकारावर सांगितले होते की, रेमडेसीवीर कुपींचा साठा महाराष्ट्र शासनास देण्यास एफडीए आयुक्तांकडुन परवानगी घेण्यात आली होती.

कारण नियार्तीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा ‘एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही. एफडीएकडून फार्मास्युटिकल कंपनीला दिलेली माहिती बीकेसी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली नाही,

जे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवर स्वतंत्रपणे वागत होते.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हा यांनी तर खालच्या पातळीवर उतरत काळे यांच्यावर मुजोरीचा आरोप केला आहे. ते म्हणले, महाराष्ट्र अडचणीत असताना स्वत:च्या परीने महाराष्ट्राला मदत केली नाही.

उलट संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं. मुजोर अधिकाºयांना बाजूला करणे योग्यच आहे. महाराष्ट्र अडचणीत असताना हे फोन बंद करुन बसतात. मुजोरच होता तो, मी शब्द मागे घेणार नाही.

FDA Commissioner Abhimanyu Kale, who had given a letter to the BJP to provide remediation, was abruptly replaced.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात