महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट फडणवीस पुन्हा आले नाहीत!!; एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस पुन्हा आले नाहीत, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची नियुक्ती मुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून या मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करणार आहेत. Fadnavis did not come again in the politics of Maharashtra !!; Eknath Shinde new CM !!

राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर तेथेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका करणारी ही घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आव्हान दिले होते की शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवा. तो मुख्यमंत्री भाजपने करून दाखवला आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी मी पुन्हा येईल अशी घोषणा केली असली तरी त्यांनी स्वतः न येता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी आणून दाखवले आहे. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या जनमताचा आवर्जून उल्लेख केला.

महाराष्ट्राने 2019 मध्ये सर्व कौल भाजप आणि शिवसेना महायुतीला दिला होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निर्णय घेऊन महाविकास आघाडी जाण्याचा निर्णय घेतला. सरकार स्थापन केले. परंतु, दररोज हिंदुत्वाचा अपमान आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीला तोडून एकनाथ शिंदे बाहेर आले. त्यांनी शिवसेना आपल्या समवेत आणली. त्यामुळे त्यांनी आज राज्यपाल महोदयांकडे सरकार स्थापनेचा दावा केला आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद घोषित केले.

Fadnavis did not come again in the politics of Maharashtra !!; Eknath Shinde new CM !!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात