आमने-सामने : चंद्रकांत खैरेंचा भागवत कराडांना टोला-यांना अजून दिल्ली समजलीच नाही ; कराडांचे प्रत्युत्तर म्हणाले – खैरे महापालिकेतील गटार साफ करण्यातच व्यस्त…


  • चंद्रकांत खैरे आणि भागवत कराड यांच्यातील राजकीय वैर लपून राहिलेले नाही.
  • यापूर्वीदेखील कराड यांच्यापेक्षा माझी उंची मोठी आहे, असे खैरे यांनी म्हटलेलं आहे.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : भागवत कराड यांना आणखी दिल्ली कळलेलीच नाही, दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केलेलं आहे. भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कुण्याही बँकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातलं आहे, ते काहीही करू शकत नाहीत, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भागवत कराड यांच्यावर केली होती, त्यानंतर केंद्रीय मंंत्री भागवत कराड यांनी खैरेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. Face to face: Chandrakant Khaire’s Bhagwat Karad tola has not yet understood Delhi; Karad’s reply said – Khaire is busy cleaning the gutters in the Municipal Corporation …

 चंद्रकांत खैरे

“भागवत कराड यांना आणखी दिल्ली कळलेलीच नाही. दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केलेलं आहे. भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कोणत्याही बँकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातलं आहे. ते काहीही करू शकत नाहीत.

भागवत कराडांच प्रत्युत्तर

चंद्रकांत खैरे माझ्यावर आरोप करतात, पण खैरे हे दिल्लीत कधीच रमले नाहीत, ते औरंगाबाद महापालिकेतील गटार साफ करण्यासारखी छोटी छोटी कामं करत राहिले, अशी टीका भागवत कराड यांनी केलीय. चंद्रकांत खैरे 50 किलोमीटर वरून साधं पाणी आणू शकले नाहीत, पण मी मात्र श्रीगोंदा इथून औरंगाबादसाठी गॅस पाईपलाईन आणली आहे. ती 130 किलोमीटर शहरात फिरवणार आहोत असा पलटवार भागवत कराड यांनी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातलं राजकारण पुन्हा तापले आहे.

औरंगाबादेत मेट्रोची मागणी करणार

पिटलाईन औरंगाबाद शहरात यावी यासाठी मी प्रयत्न केले, पण दानवेसाहेब रेल्वे मंत्री झाले आणि पिट लाईन जालन्याला गेली. पण ते औरंगाबादला पिटलाईनसाठी नाही म्हणाले नाहीत, त्यामुळे औरंगाबादसाठी सुद्धा दुसरी पिटलाईन होऊ शकते, असेही कराड म्हणाले आहेत. औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे चालू करावी यासाठी मी मागणी करणार आहे. मेट्रो कधी येईल हे माहिती नाही मात्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Face to face : Chandrakant Khaire’s Bhagwat Karad tola has not yet understood Delhi; Karad’s reply said – Khaire is busy cleaning the gutters in the Municipal Corporation …

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात