एकनाथ शिंदे – शरद पवार (न)झालेली भेट आणि माध्यमांनी सोडलेल्या पुड्या!!; पण मूळात पुड्या सोडाव्या लागतातच का??


बराच राजकीय खल आणि मशक्कत करून आणलेले शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार… त्याने विधानसभेत जिंकलेले बहुमत… याचे जेवढे दुःख शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला झालेले नाही, त्यापेक्षा जास्त दुःख मराठी माध्यमांना झालेले दिसते. त्यामुळेच वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून शिंदे फडणवीस सरकार कसे अस्थिर आहे, त्याच्यात कसा अंतर्विरोध आणि सुप्त संघर्ष आहे याच्या बातम्या तर मराठी माध्यमे रंगवून देतच आहेत, पण त्या पलिकडे जाऊन ज्यांच्या तथाकथित चाणक्यगिरीला शिंदे फडणवीस सरकारमुळे सुरुंग लागला त्यांच्या चाणक्यगिरीला महाराष्ट्रात पुनर्स्थापित करण्यासाठी मराठी माध्यमिक सरसावलेली दिसत आहेत. eknath shinde sharad pawar meets fake news

यातूनच काल रात्री सूत्रांच्या हवाल्याने एक पुडी सोडण्यात आली… रात्री म्हणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक “सिल्वर ओक”वर पोहोचले आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली… ही भेट केवळ सदिच्छा होती. पण त्यामध्ये राजकीय चर्चा झालीच नसेल असे सांगता येत नाही. त्यामुळे आता शिंदे फडणवीस सरकारच्या राजकीय भवितव्याचे नेमके काय असेल??, याची चर्चा माध्यमांनी लगेच सुरू केली. या बातमीच्या जोडीला सिल्वर ओक मधला शिंदे – पवार भेटीचा फोटो जणू ताजाच आहे असे भासवून जोडण्यात आला.

– पुडी सोडण्याचे टाइमिंग!!

त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळात मराठी माध्यमांना “अपेक्षित” असा धक्का बसला. एकतर शिंदे गटाचे आमदार इतके दिवस सुरत तिथून गुवाहाटी तिथून गोवा आणि नंतर मुंबई असे साधारण 15-20 दिवस फिरल्यानंतर हळूहळू आपापल्या मतदारसंघात पोहोचत असताना किंवा नुकतेच पोहोचले असताना शिंदे – पवार भेटीची बातमीची पुडी फोटोसकट सोडण्यात आली. त्यातही सत्तांतराचा रात्रीस खेळ चालेलला असल्यामुळे आणि त्यातही फडणवीसांचे वेशांतर गाजत असल्याने एकनाथ शिंदे यांनी “सिल्वर ओक”वर जाऊन पवारांची भेट रात्री घेतल्याच्या बातम्या सगळ्यांनाच खऱ्या वाटल्या. त्यामुळे शिंदे गटातले आमदारांची चलबिचल वाढली किंबहुना अशी चलबिचल वाढावी हाच तर बातमी आणि फोटो या संयुक्त पुडीच्या प्रयोगाचा हेतू होता.

– राजकीय हवेत 12 तास तरंगलेली पुडी

पण दस्तुरखुर्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून अशी कोणतीही भेट झाली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर करून टाकले. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील स्पष्टपणे इन्कार करून टाकल्याने बातमीतली सगळी हवा गेली. पण बातमीची पुडी मात्र महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सुमारे 12 तास तरी तरंगत होती. या निमित्ताने महाराष्ट्रात मराठी माध्यमांची कोणती आणि कशी “इकोसिस्टीम” सुरू आहे हे दिसून आले!!

eknath shinde sharad pawar meets fake news

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात