उद्योजक अविनाश भोसले यांच्या मुलाची ईडीकडून पाच तास चौकशी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले ) यांचा मुलगा अमित याची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास चौकशी केली. मनी लाँडरिंग प्रकरणात दोघांना ईडीने समन्स पाठवले होते. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours

पुणे येथील एका जमीनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे, जी जमीन सरकारी होती. या जमिनीबाबत पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीनेदेखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अविनाश भोसले, अमित भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.



त्यावर न्यायालयाने अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना चौकशीला समोरे जाण्याचे आदेश दिले होते. मुंबई न्यायालयाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले, अमित भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावे लागत आहे.

अविनाश भोसले यांना यांना 1 जुलै रोजी तर अमित यांना आज 2 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. त्यानुसार अमित भोसले ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची आज तास कसून चौकशी झाली. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. अविनाश भोसले यांच्या एबीज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. या फ्लॅटसाठी त्यांनी 103 कोटी 80 लाख रुपये मोजले आहेत.

12 फेब्रुवारीला अविनाश भोसले आणि अमित भोसले यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर भोसले यांनी ईडीविरोधात गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. तसेच 17 फेब्रुवारीला भोसले यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.

रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला.

अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाºयांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली.

ED interrogates businessman Avinash Bhosale’s son Amit for five hours

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात