दीपाली चव्हाण आत्महत्येचे कनेक्शन मेळघाटातील तस्करीशी, वरवर तपास होत असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

दीपाली चव्हाण आत्महत्येचे कनेक्शन मेळघाटातील तस्करीशी आहे. या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास झाल्यास वाघांची संख्या कमी का होत आहे, सागाची तस्करी कशी होते हे उजेडात येईल. मात्र या प्रकरणात वरवर तपास होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.Dipali Chavan suicide case has connection with smuggling in Melghat.


विशेष प्रतिनिधी 

अकाेला : दीपाली चव्हाण आत्महत्येचे कनेक्शन मेळघाटातील तस्करीशी आहे. या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास झाल्यास वाघांची संख्या कमी का होत आहे, सागाची तस्करी कशी होते हे उजेडात येईल. मात्र या प्रकरणात वरवर तपास होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आंबेडकर म्हणाले, दीपाली चव्हाण यांच्यावर दाेन वेळा ॲट्रासिटीचे गुन्हे दाखल झाले त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला. यातील फिर्यादी काेण आहेत त्यांची आर्थिक स्थिती काय याचा तपास करून सत्य जनतेसमाेर आणावे राज्य सरकारने आठ दिवसात या दृष्टीने माहिती समाेर न आणल्यास वंचितच्या नेत्या प्रा.निशा शेेडे या प्रकरणातील सत्य जाहीर करतील.रेड्डी यांचे निलंबन करून थांबू नका. त्यांला सहआराेपी केल्यास या प्रकणातील काळी बाजु समाेर येईल. त्यामुळे या प्रकरणात रेड्डीला सहआराेपी करण्याची मागणी वंचितने केली आहे, असे त्यांनी सांगितले.वाझे व परमबिर प्रकरणात १०० काेटी मध्ये काेणाचा हिससा हाेता महाविकास आघाडीमधील प्रत्येक घटक पक्षाला किती वाटा दिला जात हाेता

हे समाेर आणा, अशी मागणी करून आंबेडकर म्हणाले, देशाचे गृहमंत्री शरद पवारांच्या भेटीवर साऱ्याच गाेष्टी सार्वजनिक करायच्या नाहीत असे म्हणतात. त्यामुळे या १०० काेटीमध्ये भाजपाचाही वाटा आहे का अशी शंका आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. जर वाटा नसेल तर भाजपाने त्या भेटीमधील सत्य बाहेर सांगीतले पाहिजे.

फाेन टॅपींग प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल सार्वजनिक करावा मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिमा कायम ठेवण्यासाठी असे करणे आवश्यक आहे. अन्यथा या प्रकणात मुख्यमंत्री कार्यालयाचाही सहभाग असावा अशी शंका येऊ शकते.

Dipali Chavan suicide case has connection with smuggling in Melghat.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*