मॉरिशसमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्वत: दिली माहिती, म्हणाले…


मराठी भवनाच्या दुसऱ्या भागासाठी महाराष्ट्र सरकारने आठ कोटी रुपये दिले असल्याचेही सांगितले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘’मॉरिशसमध्ये आपला मराठी समाज आहे. आपले ‘मराठी भवन’ आहे. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करण्यात आला आहे. 28 तारखेला या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. त्याकरता मी चाललो आहे.’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Devendra Fadnavis informed about the inauguration of the statue of Chhatrapati Shivaji in Mauritius

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी 28 एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना फडणवीसांनी सांगितले की, ‘’मॉरिशसमध्ये मोठ्याप्रमाणात आपला भारतीय समाज आणि त्यामध्ये एक मजबूत असा आपला मराठी समाज सुद्धा त्या ठिकाणी आहे. मॉरिशसमध्ये आपलं मराठी भवन आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, छत्रपती शिवरायांचा एक पुतळा तयार करण्या आलेला आहे आणि २८ तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत या पुतळ्याचं त्या ठिकाणी लोकार्पण, अनावरण होणार आहे त्यासाठी मी चाललो आहे.’’

याचबरोबर ‘’तिथे जे काही मराठी भवन आहे, त्याला २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राने देणगी दिली होती. आता त्याचा दुसरा पार्ट हा आपल्याला तयार करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी ८ कोटी रुपये ही देणगी स्वरुपात मान्य केली आहे. ती आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि तिथला जो आपला मराठी समाज आहे, यांचं एक मोठं संमेलन होणार आहे. यासोबत तिथल्या काही उद्योजकांसोबत आमची चर्चा होणार आहे, विशेष करून व्यापार आणि पर्यटनाच्या संदर्भातील काही एमओयू देखील हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत.’’ अशीही माहिती फडणवीसांनी दिली.

Devendra Fadnavis informed about the inauguration of the statue of Chhatrapati Shivaji in Mauritius

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात