माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत केलेल्या आरोपांवरून राज्यपालांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अनेक भाजप नेत्यांसमवेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत, हे वाईट आहे. शरद पवार यांनी दोन दिवस बचाव केला, तर कॉंग्रेस अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला महावसुली सरकार म्हटले. Devendra Fadnavis Criticizes CM Uddhav Thackeray, Why Uddhav Thackeray is silent, Congress should Clear how much share they have in Mahavasuli government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत केलेल्या आरोपांवरून राज्यपालांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अनेक भाजप नेत्यांसमवेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहेत, हे वाईट आहे. शरद पवार यांनी दोन दिवस बचाव केला, तर कॉंग्रेस अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला महावसुली सरकार म्हटले.
ते म्हणाले की, कॉंग्रेसने ज्या पद्धतीने मौन बाळगले आहे, त्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले हे सांगायला हवे. ते म्हणाले की, आम्ही संपूर्ण प्रकरण राज्यपालांसमोर ठेवले आहे. आम्हाला आशा आहे की राज्यपालांनी या विषयावर बोलतील. फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले की, त्यांनी यावर काय कारवाई केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपने ठाकरे-पवार सरकारविरुद्ध रान पेटवले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की, अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपयांचा हप्ता गोळा करण्याचे टारगेट दिले होते. परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली झालेली असून ते आता डीजी होमगार्ड्सची जबाबदारी सांभाळत आहेत.
आपल्या बदलीला आव्हान देत परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालय आज परमबीर यांच्या अर्जावर सुनावणी करणे अपेक्षित आहे. राज्यात पुढे कोणत्या घडामोडी घडतील, हे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची बाजू मांडली. ते म्हणाले की, अनिल देशमुख रुग्णालयातच दाखल होते. परंतु, लगेचच 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या देशमुखांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ समोर आल्याने पवार तोंडघशी पडले.
भाजपचा पुराव्यांसकट आरोप, देशमुख क्वारंटाइन नव्हतेच
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर पुराव्यांसकट दाखवून दिले की, अनिल देशमुख हे क्वारंटाइन नव्हते. शरद पवारांच्या तोंडून त्यांच्याच नेत्यांनी असत्य वदवून घेतल्याचेही ते म्हणाले. शरद पवार म्हणाले होते की, अनिल देशमुख 15 ते 27 फेब्रुवारीदरम्यान क्वारंटाइन होते, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. फडणवीसांनी माध्यमांना सांगितले की, या काळात गृहमंत्री देशमुख हे नागपूर ते मुंबई खासगी विमानाने आले, नंतर परत अंत्यविधीला हजेरी लावण्यासाठी नागपुरात गेले, मुंबईत परतून त्यांनी सह्याद्री अतिथीगृहाला भेट दिली. तत्पूर्वी, या काळात गृहमंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेत होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे जाऊन गृहसचिवांना भेटून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
Devendra Fadnavis Criticizes CM Uddhav Thackeray, Why Uddhav Thackeray is silent, Congress should Clear how much share they have in Mahavasuli government
महत्त्वाच्या बातम्या
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘सामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल
- WB Opinion Poll : बंगालमध्ये भाजप घडवणार इतिहास, ममतांच्या टीएमसीला बसणार मोठा झटका
- जेष्ठ नेते ‘आझादांना’ कॉंग्रेसने केले ‘आझाद’ : घाबरलेल्या कॉंग्रेस हायकमांडने स्टार प्रचारकांच्या यादीतून गुलाम नबी आझादांना वगळले ; ‘हा कॉंग्रेसचा अंत’ ; फोडा आणि राज्य कराचा फंडा
- वाझेने कबुल केला परमबीरसिंगांचा दावा आणि घेतले आणखी एका वजनदार मंत्र्याचे नाव, ज्यानेही दिले होते वसुलीचे टार्गेट… तो मंत्री कोण?
- भारताचा दणदणीत विजय तर पदार्पणाच्या सामन्यातच कृणालचा विश्वविक्रम ! तुफानी अर्धशतक ; बनला पहिलाच क्रिकेटर
- India Vs England 1st Odi इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पंड्याची शानदार कामगिरी