देशमुख – मलिकांचा मतदानाचा अर्ज फेटाळला; मतांच्या बेगमीत महाविकास आघाडीला धक्का!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक चुरशीची झाल्यामुळे सर्वच पक्ष एकेका मतासाठी झगडत असताना आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात येणार नसल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीला निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. Deshmukh – Malik’s voting application rejected

राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांना केवळ विधानसभेतील आमदार मतदान करू शकतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख हे दोघेही सध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. यावर गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मत देण्याची परवानगी नसल्याचा निर्णय न्यायालयाने यावेळी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ही दोन मते कमी झाल्यामुळे मतांची बेगमी करताना आता आघाडीची अडचण वाढली आहे.

– ईडीचा युक्तिवाद

बुधवारी याबाबत न्यायालयात ईडीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे देशमुख आणि मलिकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी भूमिका ईडीने न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर बुधवारी न्यायालयाकडून हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. पण नंतर कोर्टाने देशमुख आणि मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचा निकाल दिला.

Deshmukh – Malik’s voting application rejected

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात