‘’… पण तुमच्या मनात कुठलीही शंका ठेवू नका, कारण पोपट मेला आहे’’ देवेंद्र फडणवीसांचं विधान!


भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंवर साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

पुणे : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक  सुरू  झाली.  या बैठकीस भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय केंद्रीयमंत्री नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर,  पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी मान्यवरांचीही  उपस्थिती होती. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा  साधाला. Deputy Chief Minister Devendra Fadnavis speech at the first meeting of BJP state executive

फडणवीस  म्हणाले, ”महाराष्ट्र सरकारवर जे लोक प्रश्न उपस्थित करत होते, मला असं वाटलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांची  तोंडं बंद होतील. पण दुर्दैवाने, कालही मी सांगितलं की राजाचा जसा एखाद्या गोष्टीसाठी आग्रह असतो, त्यावेळी त्याची प्रजा, सेनापती त्याला तसंच सांगत असतात. त्यामुळे राजाचा आवडता पोपट मेला, हे जसं कोणी सांगत नाही. तसं उद्धव ठाकरेंना हे कोणी सांगायला तयार नाही, की उद्धव ठाकरे पोपट मेला आहे. ते असंच सांगत आहेत, तो मेला नाही अजून, थोडा बोलत नाही, हालत नाही,  डुलत नाही. पण म्हणून एकदा थोडीशी स्पष्टता यावी, की सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय केलं आहे? हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. ”

‘कर्नाटक पॅटर्न’ राबवू म्हणणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा थेट इशारा, म्हणाले ‘’इथे एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे…’’

याचबरोबर ”सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेने म्हणजे आताच्या शिल्लक सेनेने जी याचिका केली होती. त्या याचिकेत एकूण आठ मागण्या होत्या. आठ पैकी त्यांची कोणती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली मला सांगा. असं विचारत फडणवीसांनी पुढील आठ मागण्या सांगितल्या आणि त्यावरील उत्तर मागितले.

पहिली मागणी – एकनाथ  शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्याचा राज्यपालांचा निर्णय़  रद्द  करा.

दुसरी  मागणी – ३ जुलै २०२२ रोजीची विधानसभेतील कार्यवाही आणि अध्यक्षाची  निवड रद्द करा.

तिसरी मागणी – ४ जुलै २०२२ रोजीची विधानसभेतील कार्यवाही आणि मुख्यमंत्र्यांच्या बाजूने पारीत झालेला  विश्वासदर्शक ठराव रद्द करा.

चौथी मागणी – एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित अपात्रतेच्या याचिका, तुमच्याकडे बोलवा आणि संविधानाचे कलम १४२ नुसार त्यावर निर्णय करा.

पाचवी मागणी – ३ जुलै २०२२ रोजी विधानसभा अध्यक्षांनी  पाठवलेलं पत्र रद्द करा.

सहावी मागणी – २८ जून २०२२ रोजी राज्यपालांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळ सचिवांना पाठवलेलं पत्र रद्द करा.

सातवी मागणी – मग त्यांनी म्हटलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलप्रमाणे ८ जुलै २०२२ रोजी विधानसभा अध्यक्षांनी बजावलेले समन्स रद्द  करा.

आठवी मागणी  – भरत गोगावले यांनी अपात्रतेसंदर्भात  सुरू केलेल्या  कारवाईला स्थगिती द्या.

यानंतर फडणवीस म्हणाले, ”या पैकी एकतरी मागणी पूर्ण  झाली आहे का? नाही. मग या  पेक्षा वेगळी मागणी तर काहीच नव्हती. या आठ मागण्या त्यांनी केल्या यातील एकही जर सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही आणि उद्धव ठाकरे म्हणतात, जा गावोगावी व सांगा आपलाच विजय झाला. बडवा ढोल, आमचं काय जातय. तुम्हीही आमच्या आनंदात सामील व्हा,  पण तुमच्या मनात कुठलीही शंका ठेवू नका, पोपट मेला आहे.”

याशिवाय ”हे सरकार पूर्णपणे संविधानिक आहे. तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने,  हे सरकार तर आपला कार्यकाळ पूर्ण करेलच पण पुन्हा एकदा निवडून येईल, हा विश्वास मी व्यक्त करतो.” असंही फडणवीस यांनी सांगितलं  आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis speech at the first meeting of BJP state executive

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात