‘’…त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे’’ देवेंद्र फडणवीसांचं विधान!


ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज निकाल देणार आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज अंतिम निकाल आहे. यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वांनाच सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार याची उत्सुकता आहे. निकालाच्या अगोदरच विविध अंदाजही व्यक्त होत आहेत. तर, अनेकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis reaction before Supreme Court verdict on the power struggle in Maharashtra

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘’आम्ही आशावादी आहोत, आमची केस मजबूत आहे. योग्य निकाल येईल अशी अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत थांबले पाहिजे. त्याकरता खूप अंदाज व्यक्त करणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. त्याच्यावर कुठलीही अटकळबाजी करणे अंदाज बांधणे योग्य नाही.’’

याशिवाय सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल देण्याआधीच अनेक राजकीय पंडितांनी आणि प्रसार माध्यमांनी परस्पर निर्णय जाहीर करुन टाकला आहे, एवढेच नव्हे त्यावर भविष्यातील राजकीय समीकरणे आणि नव्या सरकारबाबत भाकीते केली आहेत. हा प्रकार योग्य नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आम्ही निकालाबाबत आशादायी आहोत. काहीही प्रतिकूल होणार नाही. आम्ही सगळे कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, ही अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज निकाल देणार आहे. गतवर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं होतं. राज्यपालांनी त्यांच्या सरकारला मान्यता देऊन शपथ दिली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावर ते घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांचा समावेश आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis reaction before Supreme Court verdict on the power struggle in Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात