पुण्यात संचारबंदी कठोरपणे राबवा


विशेष प्रतिनिधी

पुणे : देशात करोनाची दुसरी लाट ओसरतआहे. मात्र दुसरीकडे लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांविषयी बेजबाबदार वर्तन करत आहेत. बाजारपेठांमध्ये, पर्यटनस्थळी लोक पुन्हा गर्दी करतआहेत. विशेषत: लसीचे दोन्ही डोस घेतलेले कोरोना नियमांना टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना आवाहन केलं की दोन्ही डोस झाले, तरी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही काळजी घ्यावीच लागणार आहे . Curfew in Pune Strictly enforce : Ajit Pawar Given Order to Police

पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. “पुण्यात मृत्यूदर नक्कीच कमी झाला आहे. पण लोकांनी आजही मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. ज्यांचे दोन्ही डोस झालेत, त्यांनी मास्क वापरण्याची टाळाटाळ केली आणि दुर्दैवाने अशा काही रुग्णांचं निधन झाले आहे. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी नियम पाळावेत.”

पुण्यात अनेक ठिकाणी ४ वाजेनंतर दुकानं बंद होतात. पण फेरीवाले उभे राहात असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.पुण्यात संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच दुकानं उघडी राहणार आहेत. दुकानं बंद होऊनही हातगाडीवाले सर्रासपणे उभे राहतात. त्यामुळे ४ च्या पुढे सक्तीने सगळं बंद व्हायला पाहिजे. पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत असं ते म्हणाले.

  • पुण्यात सायंकाळी ४ नंतर आता कठोर संचारबंदी
  • सायंकाळी ४ नंतर फेरीवाल्याना रस्त्यावर पूर्ण बंदी
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पोलिसांना आदेश
  • लसीचे दोन डोस घेतले तरी निर्धास्त राहू नका
  • लसीचे डोस नंतरच्या निर्धास्तपणामुळे अनेकांचे मृत्यू
  • मास्क ,सॅनिटायझर आवर्जुन वापरा
  • बाजारपेठा, पर्यटनस्थळी गर्दी कृपया टाळा
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत

Curfew in Pune Strictly enforce : Ajit Pawar Given Order to Police

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात