Covid19 : महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोना संसर्गाचे ७११ नवीन रुग्ण, चार जणांचा मृत्यू


राज्यात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : करोनामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मागील २४ तासांत राज्यात ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जे मागील दिवसाच्या तुलनेत सुमारे १८६ टक्के अधिक आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत करोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. Covid19  711 new patients of corona infection in last 24 hours in Maharashtra four people died

सोमवारी राज्यात करोनाचे एकूण २४८ रुग्ण आढळून आले असून, गेल्या सात दिवसांत राज्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११ झाली आहे. राज्यात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी सांगितले की, सरकार करोनासंदर्भात पुढील आठवड्यात मॉक ड्रील घेणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करून आम्ही पुढील आठवड्यात १३-१४ एप्रिल रोजी करोनापासून बचाव आणि आपली तयारी तपासण्यासाठी विशेष मॉक ड्रिलचे आयोजन करणार आहोत.

मंगळवारपर्यंत राज्यात करोनाचे ३७९२ सक्रीय रुग्ण आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या सात दिवसांतच या प्रकरणांमध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे. मुंबईतही गेल्या २४ तासांत २१८ नवे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, या काळात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. याशिवाय मुंबईत गेल्या २४ तासात एकूण १६५५ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. मुंबईत सध्या करोनाचे ११६२ सक्रीय रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी दर १३.१७ टक्क्यांवर गेला आहे.

Covid19  711 new patients of corona infection in last 24 hours in Maharashtra four people died

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात