एटीएसच्या शिवदीप लांडेची हिरोगिरी चालली नाही, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचे न्यायालयाचे आदेश


मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा दणका बसला आहे. एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे यांची हिरोगिरीही चालली नाही. ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन हत्येचा तपास एटीएसने तात्काळ थांबवुन एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. Court slapped Maharashtra Police, Give Mansukh Hiren murder case probe immediately to NIA


विशेष प्रतिनिधी

ठाणे: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा दणका बसला आहे. एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे यांची हिरोगिरीही चालली नाही. ठाणे न्यायालयाने मनसुख हिरेन हत्येचा तपास एटीएसने तात्काळ थांबवुन एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे गेल्यावर एटीएस अ‍ॅक्टीव्ह झाली होती. शिवदीप लांडे यांनी तर फेसबुक पोस्ट करून या तपासाचे धागेदोरे हाती लागले असल्याचे म्हटले होते.मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हाच असल्याचेही एटीएसने कबूल केले होते.विधानसभेत मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांनी आणि राज्यातील इतर मंत्र्यांनीही निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या करणाचे धागेदोरे उच्चपदस्थांपर्यंत पोहोचू लागल्यावर एटीएस अ‍ॅक्टीव्ह झाले असून सचिन वाझे हाच हिरेन हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे कबूल करू लागली.

ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा प्रताप केल्यावर सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली होती. त्याअगोदर विधानसभेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी वाझेची बाजू घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयएकडे गेल्यावर एटीएस अ‍ॅक्टीव्ह झाली होती. या हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडेच असून, राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचेही एसआयटीने म्हटले होते.

एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. रविवारी या हत्या प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गोर हा क्रिकेट बुकी आहे. शिंदे निलंबित पोलीस कर्मचारी असून, २००७च्या वसोर्वा येथील लखनभय्या बनावट चकमकीमध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे. याच गुन्ह्यात तो पॅरोल रजेवर असताना वाझेसाठी काम करीत असल्याचे समोर आले आहे.

मनसुख हत्या प्रकरणात १० ते ११ आरोपींचा समावेश असून, हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे आणि कशी केली, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विनायक शिंदे याच्या कळवा नाका येथील गोल्ड सुमित या इमारतीच्या तळमजल्यावरील घरी एटीएसच्या एका पथकाने रविवारी आणि सोमवारीही झडती घेतली. त्याचबरोबर त्याच्या घरात चौकशी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. मात्र ही सगळी घाई करूनही न्यायालयाने एटीएसकडून तपास काढून घेऊन महाराष्ट्र पोलिसांना चपराक दिली आहे.

Court slapped Maharashtra Police, Give Mansukh Hiren murder case probe immediately to NIA

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती