ठाकरे सरकारकडून कोरोनायोध्यांची उपेक्षा, डॉक्टरांना तीन महिन्यांपासून मिळाला नाही पगार

कोरोनाच्या महामारीविरुध्द प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या कोरोनायोध्दा डॉक्टांची ठाकरे सरकारने उपेक्षा चालविली आहे. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५०० हून अधिक डॉक्टरांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगारच झालेला नाही.Coronayodhis neglected by Thackeray government, doctors have not received salary for three months


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या महामारीविरुध्द प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या कोरोनायोध्दा डॉक्टांची ठाकरे सरकारने उपेक्षा चालविली आहे. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५०० हून अधिक डॉक्टरांचा गेल्या तीन महिन्यांपासून पगारच झालेला नाही.

गेल्या एक वर्षापासून कोविड रुग्णांच्या सेवेत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या या डॉक्टरांना आता आपल्या उदरनिवार्हाचा प्रश्न सतावत आहे. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास ५०० च्यावर सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत.गेले वर्षभर कोविड योद्धे म्हणून फ्रंटलाइनवर काम करीत आहेत. मात्र, त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या सहाय्यक प्राध्यापकांच्या पगाराचा घोळ वर्षभरापासून सुरू आहे. गेल्या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील या सहाय्यक प्राध्यापकांनी वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी आपापल्या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर साखळी उपोषण केले होते.

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मागण्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर या संघटनेने हे साखळी उपोषण मागे घेतले होते. मात्र या आश्वासनानंतर दोनच महिन्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सहाय्यक प्राध्यापकांचे वेतनाचे निकष बदलून त्यांच्या वेतनाची पद्धत ठराविक मानधनावर केली व राज्यातील सहाय्यक प्राध्यापकांचा रोष ओढावून घेतला.

राज्यातील कोविड महामारीत काम करणाºया आरोग्य रक्षकांचे वेतन शासनाने कोणत्याही परिस्थितीत रोखू नये. प्रत्येक महिन्यांच्या एक तारखेस वेतन करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले असले तरी या आदेशाकडे राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.

Coronayodhis neglected by Thackeray government, doctors have not received salary for three months

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*