कोरोनाच्या उपचारात खासगी रुग्णालयात लूट, तिप्पट बिल, सरासरी दीड लाख रुपये जादा


कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट झाली आहे.सुमारे तिप्पट जादा बिल आकारण्यात आले असून प्रत्येक रुग्णाकडून किमान दीड लाख रुपये जास्त घेण्यात आल्याचे पाहणीत आढळून आले आहे. अनेक रुग्णांना दागिने, फ्लॅट, शेती गहाण ठेवून बिल भरावे लागले. Corona’s treatment in a private hospital robbery, triple bill, an average of an additional Rs 1.5 lakh


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट झाली आहे.सुमारे तिप्पट जादा बिल आकारण्यात आले असून प्रत्येक रुग्णाकडून किमान दीड लाख रुपये जास्त घेण्यात आल्याचे पाहणीत आढळून आले आहे. अनेक रुग्णांना दागिने, फ्लॅट, शेती गहाण ठेवून बिल भरावे लागले.

जन आरोग्य अभियान व महाराष्ट्र कोरोना एकल परिषदेने केलेल्या राज्यव्यापी सर्व्हेचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. खाजगी रुग्णालयात प्रत्येक कोव्हिड रुग्णाला सरासरी तिप्पट दर आकारणी करून त्यांच्याकडून सरासरी दीड लाख रुपये जास्त घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातल्या 56 टक्के रुग्णांनी दागिने गहाण ठेऊन, प्लॉट-शेती विकून, खाजगी सावकारांकडून कर्ज काढून ही बिले भरल्याचे ही स्पष्ट झाले आहे.



महाराष्ट्र कोरोना एकल परिषदेचे हेरंब कुलकर्णी, जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ला यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष बुधवारी जाहीर केले. यावेळी जन आरोग्य अभियानाच्या काजल जैन, नाशिकचे संतोष जाधव, मुकुंद दीक्षित व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, सर्व्हेमध्ये बहुसंख्य मृत्यू असंघटित क्षेत्रातील ड्राइव्हर, भाजी विक्रेते, सफाई कामगार आदींचे झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाने प्रचंड पैसा गेला आणि माणूस ही गेला अशा परिस्थितीला अनेक कुटुंबांना सामोरे जावे लागले आहे.

डॉ. अभय शुक्ला यांनी सांगितले की, सर्व्हेमधील निष्कर्ष भयंकर आहेत. राज्य शासनाने एक महिन्याच्या आत या वाढीव बिलांची पडताळणी करून रुग्णांकडून आकारलेली जास्तीची रक्कम परत मिळवून द्यावी. रुग्णालय नियंत्रणाचा कायदा लागू करावा.

यावेळी कोरोनाग्रस्त रुग्णांचे कुटुंबिय सीमा भागवत, रिद्धी क्षीरसागर, अस्मा राजे यांनी त्यांना खाजगी रुग्णालयांकडून आलेले अनुभव कथन केले. त्यांच्याकडून 10 ते 17 लाख इतक्या रुपयांचे बिल आकारले गेले. त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटलनी दिलेली वागणूक व पिळवणूक अत्यंत वेदनादायी होती असे त्यांनी सांगितले.

Corona’s treatment in a private hospital robbery, triple bill, an average of an additional Rs 1.5 lakh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात