महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा कहर, एकाच दिवसांत राज्यात सापडले 24,645 नवे रुग्ण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा कहर सुरु केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या बहुतांस भागांत कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यातील मोठ्या शहरात रुग्णालयांत बेड मिळणे दुरापास्त होवू लागले आहे.Corona in Maharashtra 24,645 new patients found in the state in a single day

राज्यात काल सोमवारी एकाच दिवश तब्बल 24, 645 नवे रुग्ण सापडले, तर ५८ जणांचा बळी गेला. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 25,04,327 झाली आहे. 19,463 रुग्ण बरे होऊन घरी परतले.राज्यात आजवर एकूण 22,34,330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.22 टक्केऊ झाले आहे. राज्यात एकूण 2, 15,241 उपचाराधीन रुग्ण आहेत.

सध्या राज्यातील मृत्युदर 2.13 टक्के आहे. आजवर तपासण्यात आलेल्या 1, 84, 62, 30 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 25,05,04,327 (13.56 टक्के ) नमुने सकारात्मक आले आहेत.सध्या राज्यात 10,63,077 जण घरी अलगीकरणात आहेत, तर 11,092 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Corona in Maharashtra 24,645 new patients found in the state in a single day

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*