Corona Crisis in Maharashtra, 32,000 patients Found in one day, lockdown in Beed-Parbhani-Nanded

Corona Crisis in Maharashtra : एका दिवसात 32 हजार रुग्ण, बीड-परभणी-नांदेडमध्ये कडक लॉकडाऊन

Corona Crisis in Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला असून नवी रुग्णसंख्या मागचे सर्व रेकॉर्ड तोडत आहे. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 31,855 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाच्या या भयंकर आकडेवारीनंतर बीड, परभणी आणि नांदेडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही महाराष्ट्रासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. Corona Crisis in Maharashtra, 32,000 patients Found in one day, lockdown in Beed-Parbhani-Nanded


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला असून नवी रुग्णसंख्या मागचे सर्व रेकॉर्ड तोडत आहे. मागच्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 31,855 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाच्या या भयंकर आकडेवारीनंतर बीड, परभणी आणि नांदेडमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही महाराष्ट्रासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

यात दिलासादायक बाब अशी की, बुधवारी राज्यातील 15,098 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे 95 जणांचा बळी गेला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 25 लाख 64 हजार 881 झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 22 लाख 62 हजार 593 रुग्ण बरे झालेले आहेत. तर आतापर्यंत या विषाणूमुळे 53,684 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 47 हजार 299 जणांवर उपचार सुरू आहेत.

टेस्टिंग वाढवण्याचा परिणाम

मुंबईत वाढलेल्या कोरोना चाचणीचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. काल प्रथमच शहरात 5185 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात 12 लाख 68 हजार 094 जण होम क्वारंटाइन आहेत. तर कोविड सेंटरमध्ये 13,499 जणांवर उपचार सुरू आहेत. सर्वात मोठी बाब म्हणजे देशातील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 शहरांपैकी 9 शहरे महाराष्ट्रातील आहेत. उर्वरित 1 शहर बंगळुरू आहे. या पहिल्या 9 शहरांपैकी पुणे प्रथम स्थानावर असून तेथे संक्रमित रुग्णांची सर्वात संख्या आहे. त्यानंतर नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बंगळुरू, नांदेड, जळगाव, अकोला यांचा क्रमांक लागतो.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याचदरम्यान कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने राज्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. भारतात कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरिएंटच्या रुग्णांमध्येही वाढ दिसून येत आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण 771 रुग्ण नव्या प्रकारच्या संसर्गाशी संबंधित आहेत. त्यापैकी 726 युके आणि 34 दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातही नवीन स्ट्रेनशी संबंधित रुग्ण आढळलेले आहेत.

Corona Crisis in Maharashtra, 32,000 patients Found in one day, lockdown in Beed-Parbhani-Nanded

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*