मी देवेंद्र फडणवीस यांचाच, मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगत नरेंद्र पाटलांचा शिवसेनेला रामराम!

माथाडींच्या प्रश्नांबाबत तसेच मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणारे माथाडी कामगारांचे नेते आणि शिवसेनेकडून सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेले नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला राम राम ठोकला आहे. CM don’t have time to discuss about Mathadi workers, Narendra Patil cautioned to quit Shivsena


विशेष प्रतिनिधी

सातारा : माथाडींच्या प्रश्नांबाबत तसेच मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेणारे माथाडी कामगारांचे नेते आणि शिवसेनेकडून सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेले नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला राम राम ठोकला आहे.

वेळोवेळी मागणी करून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांबाबत आपलेपणाने चौकशी केली नाही किंवा बैठक देखील लावली नाही. आता मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, याबाबत देखील शिवसैनिक लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे आता इथून पुढच्या काळात शिवसेनेत काम करणे जमणार नाही. पक्षातून बाहेर पडलेले बरे असे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.मुंबईत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर माथाडीच्या प्रश्‍नांबाबत वर्षा किंवा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती पण ते झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी मला ए पी एम सी मार्केट सुरू करा, असे फोन करून सांगितले होते, त्यानुसार आम्ही त्यानंतर एपीएमसी मार्केट सुरू केले.

त्यानंतर माथाडी कामगारांच्या अत्यावश्यकमध्ये समावेश करून घ्यावा, असे सांगितले पण त्यांना वेळ भेटला नाही. माथाडींच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी कधीच वेळ दिला नाही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडले नाही.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना आदेश देणे गरजेचे होते पण या प्रश्नासाठी त्यांनी कधी वेळच दिला नाही. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे कमीपणा येत असेल तर मी अलिप्त राहिलेले बरे असे त्याने स्पष्ट करत शिवसेना सोडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

माथाडी चळवळ मोठी असून या चळवळीचे प्रश्न समजून घेऊन खालच्या मंत्र्यांना त्यांनी आदेश दिले गरजेचे होते, पण या प्रश्नासाठी त्यांनी कधीच वेळ दिला नाही. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्याकडे नाराजी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेत यायचे कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. मी केवळ हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेना गेलो, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजे भोसले यांची अचानक महामार्गावर भेट झाल्यानंतर शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा उल्लेख आवर्जून केला जातो. त्यांना भेटलो हा माझा वैयक्तिक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो हा माझा वैयक्तिक विषय आहे. याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसेनेच्या लोकांना माझ्यामुळे का कमीपणा यावा, असा प्रश्न करून शिवसेनेच्या नेत्यांचा मी जास्त मान देत नाही. माझे बोलणे केवळ फक्त एकनाथ शिंदे यांच्याशी होते, त्यामुळे मलाही वाटते आपण अलिप्त राहिलेले बरे.

त्यांनाही टीका-टिप्पणी नको सामान्य शिवसैनिकांना ही नाराजी नको तर नेत्यांना फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता मी आहे. काय करायचे काय नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, इतरांना त्याबाबत प्रश्न पडण्याचे कारण नाही असेही पाटील यांनी सांगितले.

CM don’t have time to discuss about Mathadi workers, Narendra Patil cautioned to quit Shivsena

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*