Change in the address of the richest family in the country?

Change in Address : देशातील सर्वांत गर्भश्रीमंत कुटुंबाचा नवा पत्ता गुजरात..? जीवाला धोका असल्यावर करणार तरी काय! कोण असेल तो धनाढ्य व बलाढ्य उद्योगपती?

Change in Address : ‘जान है तो जहान है’ या अर्थाच्या म्हणी तुम्ही सर्रास वापरतात. आपला जीव प्रत्येकालाच प्यारा असतो. मग तो गरीब भिक्षेकरी असू देत किंवा धनकुबेर! जेथे आपण लहानाचे मोठे झालो, पैसा कमावला तोही थोडाथोडका नव्हे तर मोजता येणार नाही एवढा, पण तिथे जिवालाच धोका असेल तर राहण्यात काहीच अर्थ नाही. असाच काहीसा प्रकार देशातील सर्वात धनाढ्य कुटुंबाबाबत घडला आहे. इकॉनामिक टाइम्सने या धनाढ्य कुटुंबाचे नाव न घेता त्यांच्या पत्त्यात झालेला बदल जगासमोर आणलाय. Change in the address of the richest family in the country?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘जान है तो जहान है’, सिर सलामत तो पगडी पचास, या अर्थाच्या म्हणी तुम्ही सर्रास वापरतात. आपला जीव प्रत्येकालाच प्यारा असतो. मग तो गरीब भिक्षेकरी असू देत किंवा धनकुबेर! जेथे आपण लहानाचे मोठे झालो, पैसा कमावला तोही थोडाथोडका नव्हे तर मोजता येणार नाही एवढा, पण तिथे जिवालाच धोका असेल तर राहण्यात काहीच अर्थ नाही. असाच काहीसा प्रकार देशातील सर्वात धनाढ्य कुटुंबाबाबत घडला आहे. इकॉनामिक टाइम्सने या धनाढ्य कुटुंबाचे नाव न घेता त्यांच्या पत्त्यात झालेला बदल जगासमोर आणलाय.

प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण करणारी मुंबई, मायानगरी मुंबई, राजकारण्यांची मुंबई आता गुन्हेगारांची मुंबई बनलीय का? लक्षावधींना पोटापाण्याला लावणाऱ्या मुंबईत आता श्रीमंत असणे हा गुन्हा आहे काय, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. चिक्कार दौलत कमावली, पण जिवाचाच भरवसा नसल्यामुळे देशातील हे सर्वात धनाढ्य कुटुंब मुंबईतील आपले आलिशान घर सोडून आता गुजरातच्या समुद्रकिनारी असलेल्या आपल्या एका मोठ्या प्रकल्पाशेजारी स्थलांतरित झाल्याचं ‘ईटी’नं म्हटलंय. जामनगरात असलेल्या त्यांच्या नव्या घरात अत्युच्च सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीये. येथे त्यांचा कोणी ‘बाल ही बांका’ करू शकणार नाही, एवढी ही सुरक्षा व्यवस्था कडक आहे.

पावसाने झोडपल्याचं एकवेळ ठीक आहे हो, पण राजानेच मारलं, जुलूम केला तर दाद कुणाकडे मागणार, असाच काहीसा हा प्रकार आहे. यामुळे ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या न्यायाने या देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाने मुंबईतून पसारा आवरलाय. आता देशातील हे धनाढ्य कुटुंब कोण, हे सूज्ञांना लक्षात आलेच असेल. मोठा आलास श्रीमंत, असशील मोठा तुझ्या घरी? असं बऱ्याचदा संतापून बोललं जातं. पण देशाचं अर्थचक्र फिरते ठेवण्यात याच श्रीमंतांची महत्त्वाची भूमिका असते, हे विसरून चालणार नाही. यामुळे अशा व्यक्तींना सुरक्षेच्या दृष्टीने परराज्यात आसरा घ्यायला लागणे ही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

Change in the address of the richest family in the country?

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*