देशमुखांचा वाचविणाऱ्या ठाकरे – पवारांचा तर वसूलीत वाटा नाही ना?; माजी केंद्रीय गृह सचिव आणि सध्याचे केंद्रीय मंत्री आर. के. सिंग यांचा बोचरा सवाल; १०० कोटींच्या वसूलीचा आरोप खराच!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सचिन वाझे – अनिल देशमुख १०० कोटींची खंडणीखोरी या प्रकरणावरून मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे आरोप खरेच आहेत असा मला विश्वास वाटतो,central minister and former home secretery r. k. singh allages involvement of sharad pawar and uddhav thackeray in anil deshmukh extortion case

असे सांगत केंद्रीय मंत्री आर. के. सिंग यांनी महाराष्ट्राच्या सध्या तापलेल्या राजकीय वादात उडी घेतली आहे. त्याचवेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.आर. के. म्हणाले, की ज्या प्रकारे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बचाव करीत आहेत,त्यावरून हे दोन्ही नेतेही या प्रकरणात तर सामील नाहीत ना… अशी शंका येते, असे ट्विट आर. के. सिंग यांनी केले आहे. …

आर. के. सिंग यांच्या ट्विटचे महत्त्व काय…

आत्तापर्यंत केंद्रीय मंत्र्यांपैकी कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर नाव घेऊन निशाणा साधला आहे. परंतु, आता आर. के. सिंग या केंद्रीय मंत्र्यांनीही या वादात उडी घेतली आहे. याला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने वेगळे महत्त्व आहे.

आर. के. सिंग हे आज जरी केंद्रीय मंत्री असले तरी ते वरिष्ठ आयएएस अधिकारी राहिले आहेत. केंद्रीय गृह सचिव पदाची जबाबदारी त्यांनी संभाळली आहे.

प्रशासन आणि पोलीस व्यवस्थेमधले सगळे इन – आउट्स, बारकावे, उणिवा या सगळ्यांची तपशीलवार माहिती आर. के. सिंग यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे आणि ट्विटकडे नुसते राजकीय दृष्टीने न पाहता

पाहण्यापेक्षा त्या पलिकडे जाऊन पाहिले पाहिजे. कारण त्यांच्याकडे असलेली माहिती अधिक संवेदनशील असू शकते. त्यांनी आज केलेले ट्विट हे सचिन वाझे – अनिल देशमुख खंडणीखोरी प्रकरणातले पहिले ट्विट आहे.

 

central minister and former home secretery r. k. singh allages involvement of sharad pawar and uddhav thackeray in anil deshmukh extortion case

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*