‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यातून इंदोरीकर महाराज सुटले! खटला संगमनेर न्यायालयाकडून रद्द

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल झालेला खटला न्यायालयाने रद्द केला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला. Case against Indurikar Maharaj dismissed


विशेष प्रतिनिधी

संगमनेर : सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी समाजप्रबोधनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल झालेला खटला न्यायालयाने रद्द केला आहे.

संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला. मुलाच्या जन्मासंदर्भात अंधश्रद्धा वाढविणारे वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून २०२० संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होती. इंदोरीकर महाराजांचे वकील म्हणून के. डी. धुमाळ काम पहात आहेत. त्यानंतर इंदोरीकर महाराजांविरोधात फिर्याद दाखल करणा-या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणारे अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी या खटल्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आज न्यायालयाने निकाल देत खटला रद्द केला.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.

Case against Indurikar Maharaj dismissed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*