भाजपा खासदार डॉ. सुजय विखे यांचा जनतेला रेमेडिसीवीर पुरविण्यासाठी गनिमी कावा, कोणाला पत्ता लागू न देता विमानाने आणला दहा हजार इंजेक्शनचा साठा


जनतेला रेमेडेसिवीर इंजेक्शन पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्याची महाविकास आघाडी सरकारकडून अडवणूक होण्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे नगरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ.संजय  विखे-पाटील यांनी गनिमी कावा करत कोणालाही पत्ता लागू न देता १० हजार रेमेडिसीवीर इंजेक्शन आणलीही आणि विविध रुग्णालयांना वाटलीही. त्यानंतर व्हिडीओ जारी करून ही माहिती दिली.BJP MP Dr. Sujay Vikhe’s guerrilla warfare to provide remedicivir to the people, stock of ten thousand injections


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर: जनतेला रेमेडेसिवीर इंजेक्शन पुरविण्याचा प्रयत्न करणाºयांची महाविकास आघाडी सरकारकडून अडवणूक होण्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे नगरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी

गनिमी कावा करत कोणालाही पत्ता लागू न देता १० हजार रेमेडिसीवीर इंजेक्शन आणलीही आणि विविध रुग्णालयांना वाटलीही. त्यानंतर व्हिडीओ जारी करून ही माहिती दिली.



रेमडेसिविर या इंजेक्शनच्या उपलब्धतेवरून महाविकास आघाडी व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर विखे यांनी मात्र गोपनीयता बाळगत कृती केली.

राज्याला रेमेडेसिवीर इंजेक्शन पुरविण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची महाविकास आघाडी सरकारने चांगलीच अडवणूक केली होती. दमणहून ५० हजार इंजेक्शन राज्यासाठी आणण्याचा प्रयत्न केल्यावर या कंपनीच्या मालकालाच पोलीसांनी ताब्यात घेतले.

त्याचबरोबर फडणवीस आणि दरेक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांनी रेमेडेसिवीर इंजेक्शन आणणार असल्याचे कोणालाही कळू दिले नाही. ही इंजेक्शन वाटल्यावर त्यांनी व्हिडीओ जारी केला.

राजकारण अथवा श्रेयासाठी नव्हे तर, गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. मात्र, सरकार कारवाई करेल म्हणून गोपनीयता बाळगली, असे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

त्यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिडीर्चे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिली.

यासंदर्भात प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये विखे म्हणाले, रुग्णांचा तगमगत असलेला जीव पाहवत नाही. २२ वर्षांचे तरुण देखील कोरोनाला बळी पडत आहेत. इंजेक्शन व ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होत आहे. जे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यातून लोकांना जीवनदान मिळणार नाही.

लोकांना औषधे हवी आहेत. त्यामुळे आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना माज्या मनात भीती आहे. कारण सरकार माझ्यावर कारवाई करू शकते. मात्र, या कारवाईला आपण घाबरत नाही.

लोक अडचणीत असताना त्यांना मदत करणे आवश्यक आहे. गरिबांसाठी माज्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे.गेल्या सोमवारी विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

मी आणलेले इंजेक्शन भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस की शिवसेनेच्या रुग्णाच्या शरीरात जाणार आहे हे मी पाहणार नाही. ते गरिबांच्या शरीरात जाणार आहे. त्यामुळे श्रेय घेण्यासाठी हे पाऊल उचललेले नाही.

या इंजेक्शन वाटपात मला आनंदही नाही. कोणत्याही आमदार, खासदाराने औषध आणू द्या. ते लोकांना हवे आहे. उद्या तृणमूल काँंग्रेसने इंजेक्शन दिले तरी ते घ्या, असेही विखे यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

BJP MP Dr. Sujay Vikhe’s guerrilla warfare to provide remedicivir to the people, stock of ten thousand injections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात