सायकलवर फिरून करायचा चोरी , ७७ लाखांचे सोने , ७ किलो चांदी आणि रोकद जपत


आयजी ओली पाल आणि एसएसपी बीएन मिणा यांनी संयक्त पत्रकार परिषद घेत दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केल्याची माहिती दिली. Bicycle theft, seizure of Rs 77 lakh gold, 7 kg silver and cash


विशेष प्रतिनिधी

छत्तीसगड : सायकलवर फिरणाऱ्याकडे छत्तीसगडील दुर्ग पोलिसांना घबाड सापडले आहे.यामध्ये सोन्याचे दागिने, रोकड पाहून पोलीसही चकीत झाले आहेत. आरोपीच्या अटकेनंतर ४१ गुन्ह्यांचीही उकल झाली आहे.पोलिसांना त्याच्याकडे ७७ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड सापडली आहे.

पोलिसांनी त्याच्या सहा साथिदारांनाही अटक केली आहे.यावेळी आयजी ओली पाल आणि एसएसपी बीएन मिणा यांनी संयक्त पत्रकार परिषद घेत दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केल्याची माहिती दिली.



सायकलवर फिरून टाकायचे डाका

सदर आरोपी सायकलवर फिरून श्रीमंत वस्तीत रेकी करत होते आणि संधी मिळताच डाका टाकत होते. एका प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी सायकलवर फिरणाऱ्या अनवर खान नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथिदारांसोबत डाका टाकल्याची कबुली दिली.

सहा जणांना अटक

यानंतर पोलिसांनी अनवर खान, सलागर सेन, द्वारिकादास मानिकपुरी, राजू सोनी, सोमबंद सोनी आणि जितेंद्र पवार यांना अटक केली. या सर्वांचा मास्टरमाईंड अनवर खान असल्याचे पोलिसांनी सांगितले.सागर सेन आणि द्वारिकाधीश मानिकपुरीच्या मदतीने तो चोरी करत होता आणि रोजू सोनी, सोमबंद सोनी आणि जितेंद्र पवार हे चोरीचा माल विकत होते.

Bicycle theft, seizure of Rs 77 lakh gold, 7 kg silver and cash

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात