थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा, अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

विधी मंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Atul Bhatkhalakar attack on CM Udhav Thakre


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधी मंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

विधी मंडळात उद्धव ठाकरे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वाझे याचे समर्थन केले होते. मात्र महाराष्ट्र सरकारच्याच एटीएसने आता मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार सचिन वाझे असल्याचे म्हटले आहे एटीएस प्रमुख जयजित सिंह यांनी पत्रकार परिषदेत मनसुख हिरण हत्या प्रकरणाची माहिती दिली आहे. सचिन वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका करु असंही त्यांनी म्हटले होते.मात्र आज ठाणे न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारत हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास तातडीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याचा आदेश दिला आहे. घटनास्थळी कोणताही पुरावा सापडला नव्हता, पण गुन्ह्यात वापरलेल्या सिम कार्ड्सचा आम्ही शोध लावला होता, काही सिम कार्ड्स आरोपींनी नष्ट केले होते. तसेच याप्रकरणी आता आणखी काही आरोपींना आणि संशयितांना अटक होऊ शकते.त्याप्रमाणे वाझे याचाच एक सहकारी माफीचा साक्षीदार होण्याची चर्चा आहे.

जयजित सिंग यांनी या पत्रकार परिषदेत सुरुवातीपासूनचा घटनाक्रम सांगितला. ६ मार्च रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केला. ७ मार्च रोजी याबाबतची कागदपत्रं आम्ही ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच दिवशी आम्ही विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला.

सचिन वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका करणार असून सचिन वाझे हे मनसुख हिरण हत्येतील संशयित आरोपी आहेत. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासात उघड झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मात्र याच सचिन वाझे याचे ठाकरे यांनी समर्थन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे पत्रकार परिषेद घेतली होती व यावेळी सचिन वाझेची पाठराखण केली होती. ‘सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का?’ असेही ते म्हणाले होते.

आता या प्रकरणात वाझेच दोषी असल्याचेच स्पष्ट होताच भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? विधी मंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली तो मनसुखचा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा असे त्यांनी म्हटले आहे.

Atul Bhatkhalakar attack on CM Udhav Thakre

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*