जगाचे दु;ख रसरसून भोगत ते मांडणारे अण्णाभाऊ आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत – डॉ मोहन भागवत


प्रतिनिधी

मुंबई : जगात दुःख रसरसून भोगत ते मांडलेले अण्णाभाऊ साठे आणि सावरकर हे दोन प्रतिभावंत होते. जगाचे दुःख दूर करायचे असेल तर प्रतिभावंताला दुःख दाखविले पाहिजे असे नियतीला वाटले असावे म्हणून या दोन महापुरुषांना तिने दुःख दिले. त्यांनी आपल्या प्रतिभेतून सगळे जगाचे दुःख मांडले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहेAnna bhau sathe and savarkar both were illustrious writers; says mohan bhagwat

विवेक साप्ताहिकाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मोहन भागवत यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, की अण्णाभाऊ साठे यांचे कार्य मोठे आहे. प्रामाणिकता हा त्यांचा मोठा गुण होता. आजच्या जगात प्रामाणिकता हा दुर्मिळ गुण आहे. पण तो त्यांच्याकडे होता. ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रामाणिकपणे जगले.



त्यांच्या एवढा प्रामाणिकपणा आमच्या पुढारी मंडळींमध्ये आला तर देश कित्येक पटीने पुढे जाईल. प्रामाणिकपणा हा जन्मजात असावा लागतो. अण्णाभाऊंप्रमाणेच सावरकरांचे कर्तृत्व होते. मला अण्णा भाऊ साठे आणि सावरकरांमध्ये कसलाही फरक दिसत नाही. अण्णा भाऊ साठे हे एक धार्मिक व्यक्तीमत्त्व होतं. त्यांनी सत्याची तपश्चर्या केली. सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या या चार शब्दात त्यांचं पूर्ण जीवन होते.

जगाचं दुःख दूर करण्यासाठी त्या व्यक्तीला दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा, असं कदाचित नियतीला वाटत असेल असं वाटतं. अण्णा भाऊ साठे यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाची अशी उच्च प्रतिभा असावी तर ती सावरकरांमध्ये होती, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

अण्णाभाऊंचे साहित्य कोणीही नाकारू शकणार नाही

अण्णा भाऊंचा जितका व्हायला हवा तितका परिचय महाराष्ट्राला देखील झालेला नाही. त्यांच्यावरील या ग्रंथाच्या माध्यमातून नक्की लोकांपर्यंत तो पोहचेल. अण्णा भाऊंच हे स्थान अटळ आहे, ते नाकारता येणार नाही. अण्णा भाऊंच साहित्य कोणीही नाकारू शकणार नाही. त्या साहित्यातून समाजातील मूल्य ढासळणार नाही. वाद निर्माण होतील असं काही त्यांच्या साहित्यात नाही. भारतीय मूल्यांचा परिपोष व्हावा असे त्यांचे साहित्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Anna bhau sathe and savarkar both were illustrious writers; says mohan bhagwat

विशेष प्रतिनिधी

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात