जामिनासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव, म्हणे ईडीने खोट्या गुन्ह्यात अडकविले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबइॅतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने गेल्याच आठवड्यात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. ईडीने आपल्याला चुकीच्या व खोट्या आरोपांत अडकवले आहे, असा दावा देशमुख यांनी याचिकेद्वारे केला आहे.Anil Deshmukh seeks bail in High Court, He said that ED was involved in a false crime

अनिल देशमुख यांना ईडीने २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. १४ मार्च रोजी विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. ईडी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्याला खोट्या व चुकीच्या प्रकरणात गोवत आहे. आपण आर्थिक गैरव्यवहार केला नाही, असे देशमुख यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.



अनिल देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदवीत विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. ईडीच्या म्हणण्यानुसार, अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा गैरवापर करत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याद्वारे मुंबईच्या वेगवेगळ्या बार मालकांकडून ४.७० कोटी रुपये जमविले. देशमुख यांच्या मालकीच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेद्वारे पैशाची अफरातफर करण्यात आली.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला मुंबईतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते असा आरोप मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिग यांनी केला होता. या प्रकरणात ईडीने देशमुख यांच्यावर कारवाई करत अटक केली आहे.

Anil Deshmukh seeks bail in High Court, He said that ED was involved in a false crime

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात