विशेष प्रतिनिधी
मुंबई – मनसुख हिरेन – सचिन वाझे या प्रकरणांच्या सुनावणीत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीखोरीचा विषय झाकोळला गेलाय. परंतु, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मात्र, नेमक्या याच विषयाला हात घातला आहे. १०० कोटींच्या खंडणी वसूलीमागे नेमके कोण आहे, असा सवाल आंबेडकरांनी ठाकरे – पवार सरकारला केला आहे. anil deshmukh 100 cr. extortion case; who is behind him?, asks prakash ambedkar
सध्या राज्यात राजकारण आणि प्रशासनातील गुन्हेगारी प्रवृत्तींची हातमिळवणी झाल्याचे सांगून आंबेडकर म्हणाले, या हातमिळवणीतून सध्या वसुलीचे राज्य सुरू आहे. १०० कोटींच्या कोटींच्या वसुलीचा निर्णय महाराष्ट्र कॅबिनेटचा होता की सरकारमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, की सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत मग भाजपही या भ्रष्टाचारात सहभागी आहे असे मानायचे का?, अमित शहांचे स्टेटमेंट हे त्याचाच भाग आहे का? असा सवालही आंबेडकरांनी यावेळी भाजपला केला आहे.
- देशमुखांवरील चौकशी आयोगाच्या निमित्ताने सरकारवर प्रश्नचिन्ह
अनिल देशमुखांच्या खंडणीखोरीच्या चौकशीसाठी ठाकरे – पवार सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाच्या स्थापनेवरून आंबेडकरांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. देशमुखांच्या चौकशीसाठी नेमलेला आयोग नेमका कशासाठी?, चौकशी आयोग नेमल्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय गैरव्यवहारात सहभागी होते का?, असे सवालही आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.