महाराष्ट्रात सरसकट लॉकडाउनला विविध थरातून वाढता विरोध, उद्योगपती महिंद्रादेखील विरोधात सरसावले


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या कोरोनामुळे पुन्हा लॉकडाउन करण्य्चाया हालचाली सुरु असून त्याला आता सर्व थरातून विरोध होवू लागला आहे. अनेक राजकीय पक्ष तसेच व्यापारी संघटनांनी सरसकट लॉकडाउनला विरोध केला आहे.Ananad Mahindra oppose lockdown

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जाहीर विरोध केल्यानंतर आता ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही सरसकट लॉकडाउन करण्यास विरोध केला आहे.मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारने आता पायाभूत सेवांच्या उभारणीवर अधिक लक्ष द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाउनचा फटका हा गरीब, स्थलांतरित कामगार आणि लघू उद्योजकांना बसतो, असेही महिंद्रा यांनी म्हटले आहे.

महिंद्रा यांनी या संदर्भात ट्विट करताना मनातील भावना मांडल्या आहेत. पहिला लॉकडाउन हा आरोग्यसेवा आणि रुग्णालये यांच्या उभारणीसाठी वेळ मिळावा म्हणून होता. आता मृत्यूदर कमी करण्यावर आपले लक्ष असायला हवे असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

संभाव्य लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेले कामगार तसेच छोटे – मोठे उद्योजक पुरते धास्तावले आहेत.

Ananad Mahindra oppose lockdown

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी