विरोधी बाकांवरून अजितदादांनी फेटाळले निधी वाटपातील राष्ट्रवादीवरचे आरोप!!


प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकारने विश्वास ठराव मंजूर करून घेतल्यानंतर विधानसभेत झालेल्या भाषणांमध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारचे अभिनंदन करताना काही टोलेबाजी जरूर केली. परंतु, त्यांनी प्रामुख्याने ज्या कारणांमुळे शिवसेनेचे 39 आमदार फुटून बाजूला गेले. त्यापैकी एक कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात केलेला अन्याय हे होते. मात्र या संदर्भातील आरोप अजितदादांनी विधानसभेत फेटाळून लावले. अर्थमंत्री म्हणून मी सर्व पक्षाच्या आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण आता खोटा आरोप लावून शिवसेनेचे आमदार तिकडे गेले आहेत त्यांचा निधी वाटपाच्या मुद्द्याशी काहीही संबंध नाही, असा दावा अजितदादांनी केला. Ajit Pawar rejects allegations against NCP

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर विश्वासदर्शक ठरावही जिंकला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेता निवडण्यात आला. त्यामुळे पुढील काळात अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची जागा घेताना दिसणार आहे.


Ajit Pawar : लोकांना फुकट पाणी आणि वीज आवडते, पण त्यात सगळा महसूल खर्च होतो; अजित पवारांचे वक्तव्य!!


अजित पवार हे विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची खुर्ची घेणार असून सभागृहात शिंदे सरकार विरूद्ध अजित पवार यांची जुगलबंधी पाहायला मिळणार आहे. सोमवारी सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर बहुमताचा प्रस्ताव मंजुरीसाठी बाहेरून मदत करणाऱ्यांचे देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले.

असे झाले मतदान

बहुमताच्या चाचणीत शिंदे-भाजप आघाडीने १६४ मते मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ ९९ मते पडली आहेत. यामध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या एकूण तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. तर रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांना १६४ तर महाविकास आघाडीला १०७ मते मिळाली होती. या निकालामुळे बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता राहिली होती. शिंदे-भाजप आघाडीचा विजय हा निश्चित मानला जात होता. आजच्या या निवडणुकीत एकूण २८७ आमदारांपैकी २७१ आमदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला. यामध्ये समाजवादी पक्षाच्या दोन, तर एमआयएमच्या एका आमदाराने तटस्थ भूमिका घेतली.

Ajit Pawar rejects allegations against NCP

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात