अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुटकेनंतर शरद पवार मोदी – शाहांना भेटणार


प्रतिनिधी

पुणे : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाकरे – पवार सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड जेल मधून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आर्थर रोड जेल बाहेर त्यांचे जल्लोषात स्वागत केले. देशमुख यांच्या सुटकेनंतर शरद पवारांनी दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. After Anil Deshmukh’s release on bail, Sharad Pawar will meet Modi-Shah

अनिल देशमुख यांच्यासारख्या आपल्या सहकारी नेत्यांना ज्या यातना झाल्या, त्या कोणत्याही नेत्याला होऊ नयेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होऊ नये, अशी मागणी करण्यासाठी आपण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे शरद पवारांनी पत्रकारांना सांगितले. अर्थात मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट मध्ये बदल करण्याची मागणी आपण करणार नाही. पण त्यासंबंधीचा विचार संसदेतले काही सदस्य मिळून करू, असे पवार म्हणाले.

 अनिल देशमुख यांचा दावा

सचिन वाझे आणि परमवीर सिंग या दोघांनी आरोप केल्यामुळे आपल्याला वर्षभर तुरुंगात राहावे लागले. परंतु हे आरोप खोटे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी सुटकेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

 मराठी माध्यमांच्या बातम्या

मराठी माध्यमांनी अनिल देशमुख यांच्या जामिनावरच्या सुटकेच्या मोठ्या बातम्या दिल्या आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आर्थर रोड जेल बाहेर अनिल देशमुख यांचे स्वागत केले. देशमुख यांना पाहताच त्यांच्या पत्नीला रडू कोसळले. देशमुख यांच्या तुरुंगवासामुळे कुटुंबीयांनाही यातना झाल्या याचे वर्णन करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

After Anil Deshmukh’s release on bail, Sharad Pawar will meet Modi-Shah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात