मुख्यमंत्र्यांची स्तुती करताना थोरातांचा आदित्य ठाकरे यांना मुंबई बाहेर पडून महाराष्ट्रात फिरण्याचा सल्ला!!


प्रतिनिधी

संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव कारणीभूत आहे. ते सर्वांना समजावून घेऊन एखाद्या कुटुंब प्रमुख याप्रमाणे सरकार चालवतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळत असतानाच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मात्र मुंबई बाहेर पडून महाराष्ट्रात फिरण्याचा सल्ला दिला आहे.Advice to Aditya Thackeray to leave Mumbai and travel to Maharashtra

बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केल्यापेक्षा आदित्य ठाकरे यांना दिलेल्या सल्ल्याचीच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जास्त चर्चा आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील या दंडकारण्याचे पुनरुज्जीवन या मोहिमेच्या 16 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यात झाला. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाकरे – पवार सरकार मधील राज्यमंत्री विश्वजीत कदम, सत्यजित तांबे सुधीर तांबे आदी नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाविषयी गौरवोद्गार काढले. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यांनी मुंबई बाहेर पडून संपूर्ण महाराष्ट्रात फिरले पाहिजे, असा आपण त्यांना सल्ला दिल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे सांगितले. आदित्य ठाकरे यांचा पर्यावरणाचा अभ्यास चांगला आहे. त्यांनी स्वतःहून महाराष्ट्राचे पर्यावरण खाते आपल्याकडे घेतले आहे, असे कौतुकाचे उद्गार देखील बाळासाहेब थोरात यांनी काढले.

मुंबईसह 18 महापालिकांच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये अपेक्षित आहेत. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तेथे शिवसेनेचा प्रचाराचा जोर असणे स्वाभाविक आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचे टायमिंग साधून बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांना मुंबई बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे काय?, हा सल्ला आदित्य ठाकरे मानतील काय?, हा सल्ला देण्यामागे बाळासाहेब थोरात यांचा नेमका काय हेतू आहे?, मुंबईमध्ये काँग्रेसला काही राजकीय संधी मिळवून देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांना मुंबई बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे काय?, अशा स्वरूपाची राजकीय चर्चा सोशल मीडिया आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिवाय महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे टिकल्याचे सांगून बाळासाहेब थोरात यांनी एक प्रकारे हा टोला शरद पवारांना लगावला आहे काय? याविषयी देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कुजबूज आहे.

Advice to Aditya Thackeray to leave Mumbai and travel to Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात