डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रात 45900 कोटींची गुंतवणूक; आणखी करारही अपेक्षित


वृत्तसंस्था

डाव्होस : स्वित्झर्लंड मथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे 45900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 45900 crore investment in Maharashtra at World Economic Forum in Davos

उदय सामंत म्हणाले की, सोमवारी डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडविले असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून, या माध्यमातून सुमारे 10000 तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती  सामंत यांनी सांगितली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

सामंजस्य करार असा :

  • Greenko energy Projects Pvt.Ltd 12000 कोटींची गुंतवणूक
  • Berkshire Hathaway Home Services Orenda India 16000 कोटींची गुंतवणूक
  • ICP Investments/ Indus Capital 16000 हजार कोटींची गुंतवणूक
  • Rukhi foods 250 कोटींची गुंतवणूक
  • Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. 1650 कोटींची गुंतवणूक

45900 crore investment in Maharashtra at World Economic Forum in Davos

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात