यूपीएच्या आधीपासून 30 वर्षे जुना प्रश्न संपुष्टात; सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तिकराची टांगती तलवार नाही!! ; देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आभार


प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर विभागाच्या नोटीसेस येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह, सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.2016 onwards sugar factories exempted from income tax

साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना अधिक पेमेंट झाल्यास प्राप्तीकराच्या नोटीसेस त्यांना प्राप्त होत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही, एक महत्त्वाचा निर्णय घेत आता साखर कारखान्यांना 2016 नंतरचा आयकर लागणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल आणि लगेचच त्यासंदर्भातील परिपत्रक जारी केल्याबद्दल आज नवी दिल्ली येथे देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकर्‍यांना अधिक दर दिल्याने कारखान्यांना नोटीसेस येत होत्या. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा केसेस प्रलंबित होत्या.

यासंदर्भात गेल्या आठवड्यातच एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ते दर देताना सक्षम प्राधिकरणांच्या मान्यता घेण्यात आल्या होत्या, मात्र, अनेक कारखान्यांना नोटीस आल्या होत्या. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मोदी सरकार किती गतिमान निर्णय घेते, याचा पुन्हा परिचय आला आणि अवघ्या आठवड्याभरात हा निर्णय झाला. 2016 नंतरचे कर आता रद्द केले आहेत.

त्यापूर्वीच्या प्राप्तिकराबाबत निर्णय करण्यासाठी संसदेची मान्यता घ्यावी लागणार आहे, ती सुद्धा प्रक्रिया यथावकाश होईल. यातून शेतकर्‍यांचा सुद्धा मोठा फायदा होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

2016 onwards sugar factories exempted from income tax

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात