2024 पर्यंत महाविकास आघाडीच्या 3 पक्षांचे 12 पक्ष आणि एक ना धड भाराभर चिंध्या; नारायण राणेंची घणाघाती टीका


प्रतिनिधी

मुंबई : सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. पण 2024 पर्यंत त्यांचेच 12 पक्ष होतील आणि एक ना धड भाराभर चिंध्या उडतील, अशी घणाघाती टीका केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 12 parties of 3 parties of Mahavikas Aghadi by 2024

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची माहिती दिली. संपूर्ण देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कोरोना काळात बंद पडले होते. फार मोठ्या प्रमाणावर त्यामुळे रोजगार कमी झाले होते. परंतु मोदी सरकारने 5 लाख कोटी रुपये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला दिले आणि त्या निधीतून सर्वांना कर्ज वाटप करून हे उद्योग पुन्हा उभारण्यासाठी चालना दिली. आत्तापर्यंत गेल्या 2.5 वर्षात 3 लाख 76 हजार कोटी रुपये कर्ज वाटप करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारले आहेत आणि उत्पादन कोरोना काळापेक्षा अधिक होत आहे, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.

त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केले. संजय राऊत यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांनी नकार दिला. उद्धव ठाकरेंवर त्यांनी नेहमीप्रमाणे टीका केली. पण महाविकास आघाडी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, की सध्या महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत. 2024 च्या निवडणुकीपर्यंत त्यांचे 12 पक्ष होतील आणि त्यांची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी होऊन जाईल, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले.

बैठकीतले महत्त्वाचे निर्णय

  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विस्तारित केंद्रांसाठी १५ विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून काथ्या (कॉयर) उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत, त्यात एमएसएमई उद्योग सुरू करुन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगून एमटीएचएल, मुंबई-पुणे महामार्ग विकासाचे राजमार्ग ठरणार आहेत. यामुळे उद्योग त्यातून उत्पादने आणि त्यांची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने १ ट्रिलियनचा सहभाग देण्याचा निश्चय केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
  • महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसह या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम विभागाचे मोठे सहकार्य लाभणार असून त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • खादी ग्रामोद्योग आणि काथ्या (कॉयर) उत्पादनांच्या विक्रीसाठी बृहन्मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देतानाच मरोळ येथे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाच्या प्रदर्शन केंद्राला मान्यता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
  • राज्यात जास्तीत-जास्त तरुणांना प्रशिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून तंत्रज्ञान केंद्र (टेक्नॉलॉजी सेंटर्स) उभारण्यात येणार आहेत. मुंबई आणि औरंगाबादमध्ये तंत्रज्ञान केंद्रे यापूर्वीच कार्यरत झाली असून नागपूर, पुणे येथे या केंद्रांसाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग येथील केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. त्याशिवाय अमरावती आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अतिरिक्त तंत्रज्ञान केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवली.
  • विस्तारित केंद्रांसाठी दिंडोरी, सुपा, केसुर्डी, बिडकिन, बुटीबोरी, यवतमाळ, कृष्नूर, नरडाणा, ताडाळी आदी १५ ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विस्तारित केंद्र सुरू करण्यासाठी तसेच ग्रामोद्योग विकास योजनेमध्ये ॲग्रो टुरिझमचा समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.

12 parties of 3 parties of Mahavikas Aghadi by 2024

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात