दहावीच्या निकालाचा आकड्याचा बोल; घसरला एकूण निकाल, तरी मुलीच अव्वल!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 93.83 % लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा 3.08 % कमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला आहे.  10th Result Numerical Speech; The overall result dropped, but the girls were the top

दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 % लागला आहे. तर राज्यातील 43 शाळांचा निकाल 0 % लागला आहे. तर राज्यातील 29.74 % शाळांचा निकाल 100 % लागला आहे. याशिवाय राज्यातील 151 विद्यार्थ्यांना 100 टक्के मार्क मिळाले आहेत.

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 3.82 % अधिक लागला आहे. यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 92.05 टक्के आहे.

बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी 1.00 नंतर ऑनलाईन पाहता येणार आहे.

100 टक्के विभागनिहाय शाळा 29.74 टक्के  

पुणे विभाग : 1240 टक्के  
नागपूर विभाग : 709 टक्के  
औरंगाबाद विभाग : 644 टक्के  
मुंबई विभाग : 979 टक्के  
कोल्हापूर विभाग : 1089 टक्के  
अमरावती विभाग : 652 टक्के  
लातूर विभाग : 383 टक्के  
कोकण विभाग : 427 टक्के  

राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151

100 टक्के मार्क मिळवले विभागीय विद्यार्थी संख्या : 

पुणे : 5
औरंगाबाद : 22
मुंबई : 6
अमरावती : 7
लातूर : 108
कोकण : 3

यंदा दहावीचा निकाल 93.83 %

मार्च 2020 : 95.30 %
मार्च 2021 : 99.95 %
मार्च 2022 : 96.94 %
मार्च 2023 : 93.83 %

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली.

10th Result Numerical Speech; The overall result dropped, but the girls were the top

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात