प्रतिनिधी
मुंबई ; नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा यात्रेत त्यांच्या इतर राजकीय हालचाली आणि वक्तव्ये यापेक्षा मराठी पत्रकारांनी राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला दिलेली भेट आणि त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळाचे गोमुत्राने केलेले शुद्धीकरण हाच विषय गाजवणे सुरू केले. या विषयावर नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत एकापाठोपाठ एक प्रश्न विचारले. त्यामुळे संतापून नारायण राणे यांनी पत्रकारांना झापून काढले.Narayan Rane hit out at journalists over questions of purification of Balasaheh Thackeray’s Memorial with cow urine
ते म्हणाले, की मी जन आशीर्वाद यात्रेत केंद्र सरकारची सर्व सामान्य जनतेविषयीची धोरणे सांगायला चाललो आहे. तुम्ही सारखा गोमूत्रा भोवती प्रश्न काय विचारता? दुसरे प्रश्न नाहीत का? पत्रकारांकडून पूर्वी आम्हाला मार्गदर्शन मिळायचे. त्यावेळी देखील ते आमच्यावर टीका करायचे. परंतु त्यामध्ये असला उथळपणा नव्हता. इथे प्रत्येक जण आला की फक्त गोमूत्राविषयी प्रश्न विचारतो आहे. दुसरे प्रश्नच जणू काही महाराष्ट्रात शिल्लक नाहीत आणि प्रश्नच विचारायचे असतील तर ज्यांनी गोमूत्र शिंपडले त्यांना विचारा…!!
मी महाराष्ट्राच्या जनतेला केंद्रातल्या सरकारच्या धोरणांविषयी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्या विषयी सांगण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेत आलो आहे, ही आठवण नारायण राणे यांनी करून दिली.यानंतर राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेचे उद्देश आणि केंद्र सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
यामध्ये जनधन खात्यात पासून ते शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक धोरणे त्यांनी विशद केली. त्याच बरोबर त्यांच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या योजना आणि स्टार्ट-अप यासंदर्भात माहिती दिली. युवकांनी रोजगार मागण्यापेक्षा रोजगार निर्मिती करणारे व्हावे यासाठी केंद्र सरकार विनाअडथळा स्टार्टअप कंपन्यांसाठी कशा सुविधा उपलब्ध करून देत आहे याचे सविस्तर वर्णन नारायण राणे यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App