विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचा भव्य शुभारंभ आणि कोनशिला अनावरण करण्यात आले.Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये उभारण्यात आलेले अत्याधुनिक आणि स्टेट ऑफ द आर्ट स्वरूपाचे हे लॉजिस्टिक्स पार्क राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवी गती देणारे ठरेल. जागतिक भू-राजकीय परिस्थितीत मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन क्षेत्रात भारतासमोर मोठी संधी निर्माण झाली असून, जागतिक सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी लॉजिस्टिक्स क्षेत्र सक्षम करणे आवश्यक आहे.
– पीएम गति शक्ती
आपल्याला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान निर्माण करायचे असेल, तर लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली ‘पीएम गति शक्ती योजना’ ही देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारी राष्ट्रीय मास्टर प्लॅन योजना आहे. या योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, जलमार्ग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांना एकात्मिक पद्धतीने जोडण्यात येत असून, प्रवास आणि मालवाहतूक अधिक सुलभ, वेगवान आणि कार्यक्षम होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारच्या या योजनेशी सुसंगत राहून महाराष्ट्र शासनाने राज्याचे स्वतंत्र लॉजिस्टिक्स धोरण आणि पायाभूत सुविधा विकास आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक्स हब बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणाअंतर्गत मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली यांसारख्या औद्योगिक केंद्रांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, बंदरे, रेल्वे, ड्राय पोर्ट, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क आणि फ्रेट कॉरिडोरद्वारे जोडण्यावर भर देण्यात आला आहे.
विशेषतः नागपूरला देशाचे प्रमुख लॉजिस्टिक्स कॅपिटल म्हणून विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उद्योजकांनीही महाराष्ट्र सरकारच्या या धोरणाला साथ देत गोदाम लॉजिस्टिक्स पार्कसारख्या उपक्रमांची उभारणी केली असून, हा प्रकल्प मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय चेनमध्ये एक मैलाचा दगड ठरेल असे मुख्यमंत्री फडणवीस नमूद केले.
यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक पार्कचे संचालक महावीर जैन, के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, केदारनाथ गुप्ता आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Grand Launch and stone plaque unveiling of ‘Godam Logistics Park’ at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari.
महत्वाच्या बातम्या