हा नरसंहार नाही तर काय? हिंदूची संख्या २२ टक्यांनी कमी झाली


विशेष प्रतिनिधी

ढाका : जिनोसाईड म्हणजे नरसंहार म्हणजे एखद्या विशिष्ठ धर्माच्या किंवा वंशाच्या लोकांना लक्ष्य करणे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने या शब्दाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बांग्ला देशातही गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूना लक्ष्य करण्यात येत आहे. बांगलादेशात 1947 साली हिंदूंची लोकसंख्या 30 टक्क्यांच्या आसपास होती. 1980 च्या दशकात 13.5 टक्के होती. ही लोकसंख्या आता 8.5 टक्क्यांपर्यंत घसरली. 2011 च्या जनगणनेनुसार दहा वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत तब्बल 10 लाखांची घट झाली आहे.What if it’s not genocide? The number of Hindus decreased by 22%

ढाका विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ प्रा. अब्दुल बरकत यांनी आपल्या संशोधनात गत काही वर्षांत सुरक्षा व आर्थिक कारणांमुळे दररोज जवळपास 750 हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केल्याचा दावा केला आहे. यातील बहुतांश जण भारतात येण्याचा प्रयत्न करतात.भारताने बांग्ला देशाला पाकिस्तानच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यासाठी आपली लष्करी ताकद वापरली. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांनामदत केली.



सध्या त्यांच्याच कन्या शेख हसीना यांचा अवामी लीग 2009 मध्ये पुन्हा सत्तेत आला, तेव्हा हिदूंना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांच्या काळात हिंदूंवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरूवातीला बांग्लादेश एक धर्मनिपेक्ष देश होता. पण 1980 च्या दशकानंतर त्याने स्वत:ला इस्लामिक घोषित केले. तेथील बहुसंख्यक म्हणजे जवळपास 90 टक्क्यांहून अधिक जण मुस्लिम आहेत.

बांगलादेशाल निवडणुकीवेळी हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ होते. राजकीय पक्ष मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशा हल्ल्यांना प्रोत्साहन देऊन त्याकडे दुर्लक्ष करतात. सत्तादारी अवामी ली व जमात ए इस्लामने गत दशकभरात स्वत:च्या फायद्यासाठी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.बांगलादेशात हिंदूंवर एका खास पद्धतीने हल्ले केले जातात. प्रथम सोशल मीडियावर इस्लामच्या अवमानाची अफवा पसरवली जाते. त्यानंतर काही कट्टरपंथियाचा समूह हिंदूंच्या वसाहतींवर हल्ले करतात.

गेल्या वर्षी दुगार्पुजेवेळी दुर्गा मंदिरात कुराणचा अवमान झाल्याची अफवा पसरवण्यात आली. यासंबंधीचा एका व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदूंविरोधात सर्वत्र दंगल उसळली.. बांगलादेशात मुस्लिम व हिंदू मुख्यत्वे बंगाली आहेत. म्हणजे भाषा व सांस्कृतिकदृष्ट्या ते एकच आहेत. पण, धमार्मुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. याचा फायदा कट्टरतावादी घेतात.

बांगलादेशाच्या निर्मितीपासूनच अल्पसंख्यकांवर हल्ले होतात. पण, गत दशकतात त्यात प्रचंड वाढ झाली. 2009 मध्ये अवामी लीगच्या प्रमुख शेक हसीना सत्तेत आल्यानंतर काही वर्षांनी प्रमाण वाढले आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका स्थित इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर नुकताच 200 हून अधिक कट्टरपंथियांनी हल्ला केला. इस्कॉनने एका निवेदनाद्वारे या घटनेत 3 भाविक जखमी झाल्याचे स्पष्ट केले.

बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर 6 महिन्यांत झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. गत काही वर्षांत भारता शेजारच्या या मुस्लिमबहुल देशातील अल्पसंख्यकांवरील विशेषत: हिंदूंवरील हल्ल्यांत प्रचंड वाढ झाली आहे.होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 17 मार्च रोजी ढाक्यातील वारी स्थित इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर 200 कट्टरपंथियांनी हल्ला करुन तोडफोड व लूटमार केली.

बांगलादेशात मागील 13 वर्षांत एकट्या इस्कॉनवर 6 हल्ले झालेत. विशेष म्हणजे मागील एका दशकात अन्य देशांतील इस्कॉन मंदिरांच्या तुलनेत बांग्लादेशातील इस्कॉन मंदिरांवर सर्वाधिक हल्ले झालेत.संशोधनानुसार, या 8 वर्षांत हिंदूंवरील हल्ल्यात 550 हून अधिक घरे, 440 दुकाने व प्रतिष्ठाणांना लक्ष्य करण्यात आले.

त्यांची मोडतोड व जाळपोळ करण्यात आली. या अवधीत हिंदूंची मंदिरे, प्रार्थना स्थळे व मूर्तींची तोडफोड व जाळपोळ करण्यात आल्याची 1670 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. या हिंसक घटनांत हिंदू समुदायाचे 11 सदस्य मारले गेले. तर 862 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी हिंदू महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनाही उजेडात आल्या आहेत.

शेख हसीनांनी आपल्या 12 वर्षांच्या राजवटीत मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण स्विकारले. गत एका दशकातील बांगलादेशातील इस्लामी कट्टरपंथाला चालना मिळाली. 2011 नंतर हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ झाली. अल्पसंख्यक हिंदूंवरील हल्ल्यांमागे त्यांना बेघर करण्याचा हेतू आहे. यामागे हिंदूंची लोकसंख्या कमी व्हावी असा हेतू आहे.

What if it’s not genocide? The number of Hindus decreased by 22%

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात