अमेरिकेत तयार होतेय कोरोनावरील रामबाण लस, सर्वच स्ट्रेन्सना रोखणार


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली – सध्या देशात विविध कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीवर काम सुरू असून अमेरिकेत एका लसीच्या पहिल्या टप्प्यात प्राण्यांवर झालेल्या प्रयोगातून सकारात्मक निष्कर्ष हाती आले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधकांनी ही लस तयार केली असून तिने पहिल्या टप्प्यातील प्रयोगामध्ये डुकरांचा कोरोनाच्या विषाणूपासून बचाव केल्याचे आढळून आले आहे. पोर्साइन इपिडेमिक डायरिया व्हायरस या विषाणूची डुकरांना बाधा होते.

माणसाला याची बाधा झाल्यानंतर रुग्णांना डायरिया, मळमळणे आणि ताप असा त्रास होऊ लागतो. जगभरातील डुकरांना सामान्यपणे याच विषाणूचा संसर्ग होताना दिसतो.



ही लस अस्तित्वात असलेल्या कोरोनाच्या स्ट्रेन्सना तसेच भविष्यामध्ये येऊ घातलेल्या संसर्गाला रोखण्यास पूर्ण समर्थ असल्याचे दिसून आले आहे. ही लस सर्वसामान्यांना अगदी माफक दरामध्ये म्हणजे १ डॉलरपर्यंत उपलब्ध होऊ शकेल.

Verginiya university doing new vaccine on corona


महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात