संपूर्ण जगाला महामारीच्या खाईत नेणाऱ्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुढील वर्षीच्या अखेरीपर्यंत पूर्वपदावर येईल, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केला आहे. The situation created by the corona will continue until the end of next year, Bill Gates believes
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला महामारीच्या खाईत नेणाºया कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पुढील वर्षीच्या अखेरीपर्यंत पूर्वपदावर येईल, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केला आहे. The situation created by the corona will continue until the end of next year, Bill Gates believes
एका मुलाखतीमध्ये बिल गेट्स म्हणाले की, कोविड-१९ च्या ज्या लसी विकसित झाल्या आहेत. त्यामुळे २०२२ च्या अखेरीस जगातील परिस्थिती पूर्वपदावर यायला पाहिजे. कोरोनाची साथ ही एक अविश्वसनीय आपत्ती आहे. मात्र या चिंतेच्या काळात एकच दिलासादायक बाब आहे ती म्हणजे कोरोना विषाणूवरील लस.
बिल गेट्सकोरोना लस विकसित करण्यासाठी अनेक कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तसेच लस विकसित करण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सद्यस्थितीचा विचार केल्यास जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १२ कोटी ५५ लाख ८९ हजार ४६४ एवढी झाली आहे. त्यापैकी २७ लाख ५९ हजार २४६ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
अमेरिका हा कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेला देश असून, तिथे सुमारे ३ कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी २२ लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. १ कोटी १७ लाख रुग्णांसह भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतामध्ये कोरोनावरील दोन लसींना परवानगी मिळाली असून, देशात कोरोनावरील लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली आहे.