अफगाणिस्तानात महिलांना स्वातंत्र्य; तालिबानचा दावा; पण उक्ती आणि कृतीमध्ये मोठा भेद; कंदहार मधल्या महिला बँक कर्मचाऱ्यांचे बंद केले काम


वृत्तसंस्था

काबूल : संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने महिलांवर निर्बंध लादले आहेत. त्यांच्यावर हिजाबची सक्ती केली आहे. एकटीला घराबाहेर पडण्याची मूभा ठेवलेली नाही. असे असताना तालिबानच्या प्रवक्त्याने मात्र महिलांना शिक्षणाचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य असल्याचा दावा केला आहे.Taliban claims women freedom for education and work, but act differently

तालिबानच्या आधीच्या राजवटीत महिलांवर अधिक कठोर निर्बंध होते. परंतु, आता तेवढे कठोर निर्बंध नाहीत. महिलांना शिक्षण घेण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. परंतु त्यांनी हिजाब वापरलाच पाहिजे, असे तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.



परंतु प्रत्यक्षात मात्र तालिबानच्या सैन्याच्या कृतीत भेद दिसून येत आहे. कंदहार कब्जात घेतल्यानंतर तालिबानचे सैनिक अझिझी बँकेत घुसले. तेथे काम करत असलेल्या नऊ महिलांना त्यांनी काम बंद करायला सांगितले. त्यांच्या घरातले पुरुष त्यांच्याऐवजी बँकेत काम करू शकतात, असे सांगून तालिबानचे सैनिक तिथून निघून गेले. अझिझी बँकेने या महिला कर्मचाऱ्यांना आता कामावर ठेवण्यास नकार दिला आहे.

तालिबानच्या आधीच्या राजवटीत महिलांवरील कठोर निर्बंध होते. यांमध्ये त्यांना चाबकाने आणि छडीने सार्वजनिक ठिकाणी मारणे, त्यांच्यावर दगडफेक करणे या शिक्षा होत्या. अनैतिक वर्तन ठरविण्याचा संपूर्ण अधिकार तालिबानी राजवटीकडे होता. तिथे अपील नव्हते. आता अशा प्रकारच्या शिक्षा असतील का?, हे अफगाणिस्तानची कोर्ट ठरवतील. मीडियाला सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य असते असू शकते. परंतु, त्यांनी कोणाचेही चारित्र्यहनन करता कामा नये, असे तालिबानी राजवटीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

त्याच वेळी महिलांना शिक्षण घेण्याचे म्हणजे शाळेत जाण्याचे आणि काम करण्याचे स्वातंत्र्य असू शकते असे त्याने म्हटले आहे. परंतु कंदहारमधल्या अझिझी बँकेतला प्रसंग मात्र काही वेगळेच सांगतो आहे.

तालिबानचे सैनिक आपल्या कब्जात असलेल्या शहरांमध्ये खुलेआम आनंदात बंदुकीच्या फैरी हवेत झाडत आहेत. अफगाणिस्तानात शांततेत सत्तांतर होत असल्याचे ते बंदुकीच्या फैरी हवेत झाडून जाहीर करत आहेत. काबूलमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखायला मावळते अध्यक्ष अशरफ घनी यांनी त्यांच्या सरकारी फौजांना सांगितले होते. या फौजांसमोर तालिबानी सैनिक हवेत गोळ्या झाडून आपला आनंद व्यक्त करत आहेत.

Taliban claims women freedom for education and work, but act differently

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात